Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही -प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar
Webdunia
गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (15:16 IST)
बिहारच्या निवडणूक निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी हा विजय आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलं आहे.  
 
बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही, असे म्हणत ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.
 
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला थोडक्यात बहुमत मिळाले आहे. 125 जागा जिंकत बिहारच्या मैदानात नितीश कुमार यांचा जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीने बाजी मारली आहे, असे असले तरी आपण हा एनडीएचा विजय मानत नाही असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.
 
"बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान फायदा करुन घेण्यासाठी भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता. पण भाजपचा हा डाव आम्ही पूर्णत्वास जाऊ दिला नाही," असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला आहेत. तसेच, ईव्हीएम मशिनच्या मतदानावर लोकांचा विश्वास नाही. निवडणुका ह्या बॅलट पेपरवरच घ्यायला हव्यात, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments