Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चार औषधं असलेली 'ही' गोळी दूर करते हृदयविकाराचा धोका

Webdunia
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (16:40 IST)
जेम्स गॅलाघर
बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे हृदयविकार आणि स्ट्रोकच्या रुग्णांची संख्या वाढतीये.
 
मात्र, चार औषधं असलेली एकच गोळी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचं प्रमाण एक तृतियांशाने कमी करू शकते, असं नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून 
 
सिद्ध झालं आहे.
 
अनेक औषधं असलेल्या या गोळीला 'पॉलिपिल' म्हणतात. या पॉलिपिलमध्ये रक्त पातळ करणारं अॅस्पिरीन, कोलेस्टेरॉल कमी करणारं स्टॅटीन आणि रक्तदाब कमी करणारी दोन औषधं असतात.
 
इराण आणि युकेमधल्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केलं आहे. वैज्ञानिकांच्या मते ही गोळी अतिशय परिणामकारक आहे. त्या तुलनेत या गोळीची किंमत मात्र अगदीच कमी आहे.
 
पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसणाऱ्या गरीब राष्ट्रांमध्ये विशिष्ट वयानंतर सर्वांनाच ही गोळी द्यावी, असं हे या वैज्ञानिकांनी सुचवलं आहे.
 
जगभरात हृदयविकार आणि स्ट्रोक या दोन कारणांमुळे दरवर्षी 1 कोटी 50 लाख लोकांचा मृत्यू होतो. धूम्रपान, लठ्ठपणा आणि कमी व्यायाम या सर्वांमुळे हृदय कमकुवत होतं.
 
लॅन्सेटमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. इराणमधल्या 100 हून अधिक गावांमध्ये हे संशोधन करण्यात आलं. यामध्ये 6,800 हून अधिक लोक सहभागी झाले होते .
 
यातल्या निम्म्या लोकांना ही पॉलीपिल देण्यात आली आणि जीवनशैलीत सुधारणा करण्याचा सल्ला दिला गेला. तर उर्वरित निम्म्या लोकांना केवळ जीवनशैलीत सुधारणा करण्यास सांगितलं गेलं.
 
पाच वर्षांनंतर...
पॉलिपिल घेतलेल्या 3,421 जणांपैकी 202 जणांना हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागलं.
ही टॅबलेट न घेतलेल्या 3417 जणांपैकी 301 जणांना हृदयविकारानं ग्रासलं.
ही प्रतिबंधात्मक गोळी दिलेल्या 35 जणांपैकी एकाला पाच वर्षात हृदयविकाराची गंभीर समस्या निर्माण होणार नाही, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला.
 
बर्मिंगघम विद्यापीठातले प्राध्यापक टॉम मार्शल यांनी बीबीसीला सांगितलं, "विकसनशील किंवा मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी आम्ही ठोस पुराव्यानिशी एक योजना दिली आहे. अशा देशांची संख्या मोठी आहे."
 
या गोळीमुळे रक्तदाबावर विशेष परिणाम न होता खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं या अभ्यासातून आढळून आलं. ही गोळी ज्यांचं वय पन्नास वर्षांपेक्षा जास्त आहे अशा लोकांना देण्यात आली.
 
इराणमधल्या इस्फहान युनिवर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सचे डॉक्टर निझल सराफ्झदेगान म्हणतात, "पॉलिपिल खूपच परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारण्यात नक्कीच मदत होईल. शिवाय, जगभरात मृत्यू होण्यामागचं महत्त्वाच्या कारणालाही रोखू शकेल."
 
2001 सालापासून या पॉलिपिलविषयी चर्चा आहे. मात्र त्याची परिणामकारकता सिद्ध करणारी ही पहिली मोठी चाचणी आहे.
 
युके आणि इतर श्रीमंत देशांमध्ये प्रत्येक रुग्णाला तपासण्यासाठी डॉक्टरांकडे पुरेसा वेळ असतो. शिवाय त्यांच्याकडे औषधांचेही बरेच पर्याय उपलब्ध असतात.
 
प्राध्यापक मार्शल यांनी सांगितलं, "यूकेमध्ये याचा विशेष फायदा होणार नाही. शिवाय तुम्हाला देण्यात आलेल्या गोळ्यांची क्लिनिकल ट्रायल घेण्याची तुमची इच्छा असू शकते."
 
या औषधाला युकेमध्ये परवानगी मिळालेली नाही. शिवाय ते तसं मिळणंही थोडं किचकट असेल.
 
ब्रिटनमध्ये उच्च रक्तदाब असणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीला आपल्याला असा काही त्रास आहे याची कल्पनाही नसते, असं ब्रिटीश हार्ट फाउंडेशनने सांगितलं आहे.
 
"याचा अर्थ ब्रिटनमध्ये ज्यांना आपल्याला हाय कोलेस्टेरॉल किंवा उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच नाही अशांची ओळख पटवणं आणि त्यांना लिहून दिलेली औषधं वेळच्या वेळी घेण्यास प्रोत्साहित करणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे," असं या संस्थेचं म्हणणं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments