Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आईचा मृतदेह 10 वर्षं फ्रीझरमध्ये ठेवणाऱ्या महिलेला अटक

Webdunia
शनिवार, 30 जानेवारी 2021 (21:27 IST)
जपानमधील एका महिलेने तिच्या आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवल्याची घटना उघडकीस आलीय. जपानमधील पोलिसांनी या महिलेला अटक केलीय.
 
युमी योशिनो असं या अटक केलेल्या महिलेचं नाव असून, ती 48 वर्षांची आहे.
 
स्थानिक माध्यमांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युमी योशिनो यांना त्यांच्या आईचा मृतदेह सापडला आणि त्यांनी 10 वर्षे लपवून ठेवला. कारण त्यांना टोकियोच्या बाहेर जायचं नव्हतं.
 
मृतदेह पूर्णपणे गोठलेला होता. त्यामुळे त्यावर कुठलीही जखम दिसत नव्हती, असंही पोलिसांनी सांगितलं.
 
तपास करणाऱ्या पथकाला महिलेच्या मृतदेहाची वेळ आणि कारण अद्याप कळू शकलं नाहीय.
 
एका सफाई कामगारामुळे फ्रीझरमध्ये मृतदेह ठेवला असल्याचं समोर आलं. घराचं भाडं भरू न शकल्यानं युमी योशिनो यांना घर सोडण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर त्यांच्या घराची सफाई करण्यासाठी गेलेल्या कामगाराला हा मृतदेह फ्रीझरमध्ये आढळला.
 
फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी मृतदेहाला तसं दुमडण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं.
 
युमी योशिनो यांना टोकियोजवळील चिबा शहरातील एका हॉटेलमधून शुक्रवारी (29 जानेवारी) अटक करण्यात आली.
 
कोलकात्यातही घडली होती अशी घटना

ही घटना दुर्मिळ असली तर पहिली नक्कीच नाही. यापूर्वीही विविध कारणांसाठी लोकांनी आपल्या प्रियजनांचे मृतदेह गोठवून ठेवल्याची उदाहरणं आहेत.
 
भारतात कोलकात्यात अशीच एक घटना घडली होती. हिंदुस्तान टाईम्सनं या घटनेची बातमी दिली होती.
 
कोलकात्यातील व्यक्तीने आईचा मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवला होता. धक्कादायक म्हणजे, त्याच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं की, घरात असं काही मुलानं केलंय हे त्यांना माहित नव्हतं.
 
सुभब्रता मुजुमदार असं या व्यक्तीचं नाव आहे. 2018 सालची ही घटना आहे.
 
या व्यक्तीला पोलिसांनी अलिपूर कोर्टात हजर केलं तेव्हा, न्यायाधीशांनी त्याला 500 रुपयांच्या दंडावर सोडलं आणि राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये मानसोपचारासाठी पाठवलं होतं.
 
या व्यक्तीच्या आईचा मृत्यू एका खासगी नर्सिंग होममध्ये 17 एप्रिल 2015 रोजी झाला. मात्र, या व्यक्तीने आईचा मृतदेह जतन करण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवला होता.
 
दोन मजली इमारतीत मुजुमदार कुटुंब राहत होतं. दुसऱ्या मजल्यावर सुभब्रता ही व्यक्ती वडिलांना जाऊ देत नव्हती. कारण या मजल्यावर फ्रीझरमध्ये आईचा मृतदेह त्यानं ठेवला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments