Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Chaitra Navratri विशेष गुजरातमधील प्रसिद्ध देवी मंदिरांना द्या भेट

Webdunia
शनिवार, 5 एप्रिल 2025 (07:30 IST)
India Tourism : चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मात महत्त्वाचा सण मानला जातो, नवरात्रीचे नऊ दिवस देवी आईची पूजा केली जाते उपवास केला जातो. या खास पर्वावर तुम्ही गुजरातमधील प्रसिद्ध माता मंदिरांना भेट नक्की देऊ शकता. गुजरातमध्ये अशी अनेक प्रसिद्ध मंदिरे आहे जिथे भक्त देवीच्या दर्शनासाठी दूरदूरून येतात.
ALSO READ: Chaitra Navratri विशेष महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवी मंदिरांना देऊ शकता भेट
रुक्मिणी देवी मंदिर
गुजरातमधील द्वारकेला चैत्र नवरात्रीला नक्कीच भेट देण्याची योजना आखू शकता. येथे रुक्मिणी देवी मंदिरचे मंदिर आहे. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाची पत्नी देवी रुक्मिणीला समर्पित आहे. हे मंदिर द्वारकेपासून २ किमी अंतरावर आहे. हे मंदिर एका पाण्याच्या तळ्यावर आहे. या मंदिराचा इतिहास सुमारे २५०० वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते.  

आशापुरा माता मंदिर
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात असलेले आशापुरा माता मंदिर हे मंदिर राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर मानले जाते. नवरात्रीच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी दिसून येते.आशापुरा माता मंदिर हे चौथ्या शतकात बांधले गेले असे सांगितले जाते.  
ALSO READ: Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर
कालिका माता मंदिर
गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर कालकाजी टेकडीच्या माथ्यावर आहे. हे पंचमहाल जिल्ह्यातील हालोल जवळील पावगड टेकडीवर वसलेले आहे. हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. चैत्र नवरात्रीत हजारो लोक या मंदिराला भेट देतात.
ALSO READ: Chaitra Navratri 2025 : चंद्रिका देवी मंदिर लखनऊ
अंबाजी मंदिर
गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध अंबाजी मंदिर खूप सुंदर आहे. हे बनासकांठा जिल्ह्यात आहे. देवी दुर्गाला समर्पित हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की येथे देवीची मूर्ती नाही. येथे एका पवित्र श्रीयंत्राची पूजा केली जाते. नवरात्रीनिमित्त या ठिकाणी लोकांची गर्दी दिसून येते.<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत

त्याने माझ्या ओठांवर चुंबन घेतले आणि म्हणाला, 'वडील असेच करतात', अंजली आनंदसोबत घडला घृणास्पद प्रकार

कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यास सज्ज, ईदच्या दिवशी केली 'किस किस को प्यार करूं २' ची घोषणा

राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत "अशी ही जमवा जमवी" चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित !!

सर्व पहा

नवीन

सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधील सर्वोच्च 5 स्पर्धकांची नावे उघड झाली!

चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक

इंडियन आयडॉल 15 मध्ये भूषण कुमारने स्नेहा शंकरला तिच्या कारकिर्दीला वेगळे वळण देणारी संधी देऊ केली!

वेब सिरीज पंचायत 4 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुढील लेख
Show comments