Dharma Sangrah

गलतेश्वर महादेव मंदिर सुरत

Webdunia
सोमवार, 22 डिसेंबर 2025 (07:30 IST)
India Tourism : भारतात भगवान शिवाच्या अनेक मोठ्या सुंदर अश्या प्रतिमा आहे. अनेक जण भोलेनाथांची भक्ती करतात. तसेच या मोठ्या सुंदर अश्या प्रतिमा पाहण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी ठीक ठिकाणी भेट देतात. तशीच एक भव्य आणि अद्भुत, सुंदर उंच शिवाची मूर्ती सुरत मध्ये तापी नदीच्या किनाऱ्यावर स्थापन केली आहे. या मंदिराला गलतेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे दृश्य खूपच सुंदर आहे. तसेच हे सुरतमधील सर्वात सुंदर मंदिरांच्या यादीत येते.
ALSO READ: Mahakaleshwar श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग
सुरतमधील गलतेश्वर महादेव या मंदिरातील महादेवाची मूर्ती प्रचंड मोठी आणि सुंदर आहे. जी अनेक पर्यटकांना आकर्षित करते. मंदिराच्या बाजूला तापी नदी वाहते. मंदिरात भाविकांसाठी एक मोठा तलाव देखील बांधण्यात आला आहे, जिथे भाविक स्नान करून आशीर्वाद घेऊ शकतात. यासोबतच, मंदिर परिसरात देवाशी संबंधित अन्नपदार्थ आणि मूर्ती आणि पूजा साहित्य उपलब्ध आहे.

तसेच येथील महादेवाची मूर्ती ही 62 फूट उंच आहे. गलतेश्वर महादेव मंदिर सुरतपासून सुमारे 40 किमी  अंतरावर तापी नदीच्या काठावर आहे. तसेच गुजरातमधील भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. अनेक पर्यटक या अद्भुत मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येथे दाखल होत असतात.
ALSO READ: एकलिंगजी मंदिर उदयपुर
गलतेश्वर महादेव मंदिर सुरत जावे कसे?
गलतेश्वर महादेव मंदिर सुरतपासून सुमारे 40 किमी अंतरावर आहे. सुरत हे जंक्शन असून सुरत मध्ये जाण्यासाठी अनेक शहरांमधून रेल्वे सेवा आणि बस सेवा उपलब्ध आहे. सुरत मध्ये पोहचल्यानंतर कॅब
ऑटोच्या मदतीने मंदिरापर्यंत सहज पोहचता येते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआयने थलापती विजयला नोटीस बजावली

Tourist Cities in Maharashtra : महाराष्ट्रातील मोठी शहरे आणि त्यांची मुख्य आकर्षणे

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

भाजप नेत्याच्या विधानावर रितेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली

Doctor Patient Joke स्वर्गवासी

पुढील लेख
Show comments