Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Diwali 2024 : हे मंदिर वर्षभरात फक्त दिवाळीलाच उघडते, पत्र लिहून मागितली जाते इच्छा

Webdunia
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)
दिवाळीचे पर्व जवळ येत आहे. दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अनेक जण दिवाळीमध्ये फिरायला जातात. याकरिता आज आपण भारतातील अश्या एका मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत जे फक्त वर्षभरातून एकदाच दिवाळीमध्ये उघडले जाते. 
 
भारतातील कर्नाटक राज्यातील बेंगळुरू पासून 180 किमी अंतरावर हसनंबा मंदिर आहे. जे देवीला समर्पित आहे.हे मंदिर फक्त दिवाळीमध्येच आठवडाभर उघडण्यात येते. तसेच दीप प्रज्वलित करून वर्षभरासाठी बंद करण्यात येते. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे हसनंबा मंदिर भारतातील एक मात्र असे मंदिर आहे, जे फक्त दिवाळीमध्ये उघडते.     
 
इतिहास-
हे मंदिर 12 व्या शतकात बांधण्यात आले आहे. तसेच 823 वर्ष प्राचीन हे मंदिर परत येणाऱ्या दिवाळीला उघडले जाईल. या मंदिरातील देवीआईच्या दर्शनासाठी दुरदुरून भक्त दर्शनासाठी येतात. तसेच हे एक चमत्कारिक मंदिर आहे असे सांगण्यात येते. भक्त इथे पत्र लिहून इच्छा मागतात व त्यांच्या इच्छा देवीआई पूर्ण करते.  
 
देशातील हे पहिले मंदिर आहे. जिथे भक्त देवी आईला पत्र लिहून आपली इच्छा व्यक्त करतात. दिवाळीच्या पर्वावर मोठ्या संख्येने भक्तगण इथे दर्शनासाठी पोहचतात. यामंदिरात देवीला फक्त तांदळाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. 
 
पौराणिक आख्यायिका- 
या मंदिराची पौराणिक आख्यायिका आहे की, अंधकासुर या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून अदृश्य होण्याचे वरदान मागितले होते. यानंतर त्याने पृथ्वीतलावावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भगवान शिवाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळी भगवान शिवाने अंधकासुराचा वध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या शरीरातून रक्ताच्या थेंबाने तो राक्षस पुन्हा जिवंत व्हायचा. शेवटी शिवाने आपल्या सामर्थ्याने योगेश्वरी देवीची निर्मिती करून राक्षसाचा संहार केला.
 
हसनंबा मंदिर कसे जावे? 
हसनंबा मंदिरापासून जवळचे एयरपोर्ट बेंगळुरू एयरपोर्ट आहे. तिथून कॅब करून नक्कीच मंदिरापर्यँत पोहचता येते. तसेच बेंगळुरू रेल्वे स्टेशनवरून देखील हसनंबा मंदिर पर्यंत पोहचता येते. तसेच हे मंदिर म्हैसूर आणि हुबळीपासून देखील जवळ आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महाराष्ट्रीयन करवाचौथ क्यों नहीं मनाते ?

शब्दाने शब्द वाढतात

अक्षय कुमार स्काय फोर्ससोबत उड्डाणासाठी सज्ज, जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार!

काळ्या हरणाची पूजा बिश्नोई समाज करतो हे सलमान खानला माहीत नव्हते, एक्स गर्लफ्रेंड सोमी अली म्हणाली- लॉरेन्सची माफी मागणार

पुष्पा 2 द रुलमध्ये धमाका होणार,गाण्यात दिसणार ही अभिनेत्री?

सर्व पहा

नवीन

Diwali 2024 : हे मंदिर वर्षभरात फक्त दिवाळीलाच उघडते, पत्र लिहून मागितली जाते इच्छा

नवर्‍यासाठी बायकोची मनापासून प्रार्थना

सिंघम अगेन' फेम अभिनेत्रीला मुंबई पोलिसां कडून अटक

महाराष्ट्रीयन करवाचौथ क्यों नहीं मनाते ?

शब्दाने शब्द वाढतात

पुढील लेख
Show comments