rashifal-2026

Giant Waterparks जगातील सर्वात सुंदर वॉटरपार्क्स; मजेचा अनोखा अनुभव हवा असेल तर नक्की एक्सप्लोर करा

Webdunia
शनिवार, 20 डिसेंबर 2025 (07:30 IST)
Foreign Tourism : सुट्टी असो किंवा वीकेंड ट्रिप, सर्व वयोगटातील लोकांना वॉटरपार्क्समध्ये मजा करायची असते. तसेच जगातील सर्वात मोठ्या वॉटरपार्क्समध्ये दुबईचे अटलांटिस अ‍ॅक्वाव्हेंचर, ब्राझीलचे बीच पार्क आणि फ्लोरिडाचे डिस्ने टायफून लगून यांचा समावेश आहे. ही पार्क्स त्यांच्या विशालतेसाठी आणि मजेदार राईड्ससाठी जगभरात लोकप्रिय आहे. या पार्क्समध्ये केवळ जागतिक दर्जाच्या वॉटर स्लाईड्स आणि राईड्सच नाहीत तर पर्यटकांसाठी असंख्य साहसी ठिकाणे, खेळ, फूड कोर्ट आणि रिसॉर्ट्स देखील आहे. तुम्हाला देखील वॉटरपार्क्सला भेट द्यायची असले तर आज आपण जगातील सर्वात मोठे आणि सर्वात लोकप्रिय वॉटरपार्क्स बद्दल जाणून घेऊ या... 
 
वॉटर किंगडम मुंबई
मुंबईतील वॉटर किंगडम हे भारतातील आणि आशियातील सर्वात मोठे वॉटर पार्क मानले जाते. हे मुंबईतील गोराई येथे हे स्थित आहे. 'वेटलांटिक' म्हणजेच जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित लाटांचा पूल हे येथील खास आकर्षण आहे. तसेच  व्हॉट-अ-कोस्टर, द लगून आणि ॲडव्हेंचर अ‍ॅमेझोनिया या येथील प्रसिद्ध राईड्स आहे.
 
वंडरला बेंगळुरू 
बेंगळुरू मधील वंडरला हा वॉटर पार्क भारतातील सर्वोत्तम वॉटर पार्कपैकी एक असून ६० पेक्षा जास्त राइड्स, हाय-स्पीड वॉटर स्लाइड्स आणि वेव्ह पूल येथे आहे. तसेच हा वॉटर पार्क स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध आहे. 
 
दुबई अ‍ॅडव्हेंचर वॉटर पार्क
जगातील सर्वात मोठे वॉटर पार्क अ‍ॅडव्हेंचर दुबईच्या 'अटलांटिस द पाम' रिसॉर्टमध्ये आहे. येथे १०५ हून अधिक राईड्स, जगातील सर्वात उंच स्लाईड्स, डॉल्फिन बे एक्सपिरीयन्स आणि 'लीफ ऑफ फेथ' राईड सारख्या क्रियाकलाप आहे. येथे १.६ किलोमीटर लांबीची नदी, वेव्ह पूल आणि एक विशेष मुलांचा झोन देखील आहे. त्याची भव्यता आणि लक्झरी हे त्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे.
ALSO READ: Christmas Destinations 2025 ख्रिसमस दरम्यान ही ठिकाणे खास बनतात; नक्कीच भेट द्या
सियाम पार्क टेनेरिफ, स्पेन
सियाम पार्कला सलग वर्षांपासून जगभरातील प्रवाशांनी क्रमांक १ वर मत दिले आहे. ते त्याच्या थीम असलेल्या राईड्स, जायंट वेव्ह पूल आणि टॉवर ऑफ पॉवर स्लाईड्ससाठी प्रसिद्ध आहे. येथील नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे, जी कुटुंबांसाठी एक विशेष आकर्षण आहे.
 
ब्राझील बीच पार्क
ब्राझील बीच पार्क अंदाजे १.८ दशलक्ष चौरस फूट क्षेत्र व्यापते आणि २०२५ च्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची "इन्सानो" वॉटर राईड जगातील सर्वात उंच मानली जाते. येथे स्पोर्ट्स कोर्ट, फिटनेस एरिया, साहसी स्लाईड्स आहे, जे मुलांसाठी आणि प्रौढांसाठी भरपूर मजा देतात.
 
डिझ्नीचे टायफून लगून फ्लोरिडा
डिझ्नीचे टायफून लगून अमेरिकेतील सर्वात मोठे वेव्ह पूल आणि नेत्रदीपक वॉटर राईड्ससाठी ओळखले जाते. येथे फॅमिली स्लाईड्स, अॅडव्हेंचर राईड्स आणि मुलांसाठी सुरक्षित पूल एरिया आहे. स्वच्छता आणि थीमिंग जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. या वॉटर पार्कची विशालता, अॅडव्हेंचर राईड्स आणि आधुनिक सुविधा त्यांना आंतरराष्ट्रीय पर्यटनात एक आकर्षण बनवतात. दरवर्षी लाखो लोक त्यांच्या राईड्स, पूल आणि मजेदार क्रियाकलापांचा आनंद घेण्यासाठी या वॉटर पार्कला भेट देतात. जर तुम्हाला वॉटर अॅडव्हेंचर आणि मजेचा अनोखा अनुभव हवा असेल तर या पार्क्सना नक्की एक्सप्लोर करा.
ALSO READ: New Year Special अशी ठिकाणे एक्सप्लोर करा जी तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसतील

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

पोंगल २०२६: पांढऱ्या साड्या बॉलीवूड अभिनेत्रींनी स्वतःच्या अनोख्या शैलीत पारंपारिक सुंदरपणे नेसली

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

Makar Sankranti Special भारतात या शहरांमध्ये पतंग उडवण्याचे भव्य कार्यक्रम होतात

अभिनेते जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी मुंबईतील ११ मजली व्यावसायिक इमारत ५५९ कोटींना विकली

पुढील लेख
Show comments