Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरिस्का आणि रणथंभोर राष्ट्रीय अभयारण्य राजस्थान,येथे एकदा तरी भेट द्या

Webdunia
सोमवार, 28 जून 2021 (16:58 IST)
भारताच्या जंगलात हत्तीचे ओरडणे,मोराचा नाच,उंटाची सैर,सिंहाची गर्जना,पक्ष्यांची किलबिलाहट ऐकायला आणि बघायला मिळते.भारतात वन्यप्राणी मोठ्या संख्येत आहे.इथे वन्य प्राणी बघायला देश-परदेशातून लोक येतात. भारतात पक्षी अभयारण्या व्यतिरिक्त 70 हून अधिक राष्ट्रीय उद्याने आणि 500 ​​हून अधिक वन्यजीव अभयारण्य आहेत.चला या वेळी राजस्थानच्या सारिस्का आणि रणथंबोर बद्दल जाणून घेऊ या.
 
1 राजस्थानमध्ये दोन राष्ट्रीय उद्याने आणि एक डझनहून अधिक अभयारण्य आणि दोन संरक्षित क्षेत्र आहेत.
 
 
2 जुन्या अरावली पर्वतरांगाच्या कोरड्या जंगलात सरिस्का नॅशनल पार्क आणि टायगर रिजर्व्ह आहे तर दुसरी कडे रणथंबोरचे जंगल.
 
3 सरिस्का राष्ट्रीय उद्यान आणि टायगर रिजर्व्ह -सारिस्काला वर्ष 1955 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले होते आणि 1979 मध्ये हे प्रोजेक्ट टायगरच्या अंतर्गत टायगर रिजर्व्ह बनवले गेले.
 
4 हे उद्यान जयपूर पासून 110 किमी.आणि दिल्ली पासून 200 किमी अंतरावर आहे.
 
5 जंगलाने भरलेली दरी ओसाड पर्वताच्या श्रेणींनी वेढलेली आहे.हे पार्क 800 चौरस किमी क्षेत्रात पसरलेले आहे,तर 498 चौरस किमी याचे मुख्य भाग आहे.
 
6 रणथंभोर-रणथंभोर राष्ट्रीय वन्यजीव उद्यान उंच टेकडीवर वसलेले आहे. जिथे पूर्वी लोकसंख्येने भरलेला मजबूत रणथंभोर किल्ला होता.
 
7 रणथंभोर किल्ला समुद्रसपाटीपासून 401 मीटर उंच टेकडीवर बांधलेला आहे. या किल्ल्यामुळे या जंगलाला रणथंभोरचे जंगल म्हणतात.
 
8 इथे बाघ व्यतिरिक्त बिबट्या,हरीण,चितळ,नीलगाय,रानडुक्कर आणि बरेच प्रकारचे पक्षी मोठ्या संख्येने आहे. 
 
9 सन 1192 मध्ये पृथ्वीराज चौहान यांचे नातू गोविंदा यांनी राज्य केले. नंतर त्यांचा  मुलगा बागभट्ट याने किल्ल्यातील वसलेले शहर सुशोभित केले.1282 मध्ये चौहान घराण्याचा राजा हमीर येथे राज्य करत होता.सन 1290 मध्ये जलालाउद्दीन खिलजीने तीन वेळा हल्ला करून जिंकण्याचा प्रयत्न केला.नंतर वर्षभर घेराबंदी करून 1301 मध्ये हे जिंकले.हमीरच्या मृत्यूनंतर चौहानांचे राज्य संपुष्टात आले.मुस्लिम विजेत्यांनी किल्ल्याच्या मजबूत भिंती उध्वस्त केल्या.
 
10 मालवाच्या शासकांनी 16 व्या शतकात राज्य केले.राणा सांगा यांनी आपले सैन्य मजबूत केले.राणा सांगाचा पराभव करण्यासाठी मुघलांनी बऱ्याचवेळा हल्ला केला या मध्ये राणा सांगा जखमी झाले आणि त्यांच्या पराभवानंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात आला.
 
 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments