Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गिर्यारोहणाला जाताना कोणती सावधगिरी बाळगायला पाहिजे, जाणून घ्या...

Webdunia
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (11:38 IST)
डोंगर चढणं, एखाद्या पर्वताचं शिखर सर करणं यासारखा थरार नाही. गिर्यारोहण करताना आपण बरंच काही शिकत असतो. आपल्या देशात गिर्यारोहकांची संख्या कमी नाही. तुम्हालाही गिर्यारोहण करायचं असेल तर छोट्या ट्रेक्सने सुरूवात करून या क्षेत्रात पुढे जाता येईल. गिर्यारोहक म्हणून तुम्ही देशाविदेशात फिरू शकता. पण हा आनंद मिळवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दयायला हवं.
 
* गिर्यारोहणाची आवड असेल तर याचं रितसर प्रशिक्षण घेऊ शकता. विविध पर्वतरांगा, तिथलं वातावरण, चढाईचा नेमका काळ, पद्धत याची शास्त्रशुद्ध माहिती तुमची चढाई अधिक सुलभ करू शकते.
* चढाई मोठी असो किंवा छोटी... पूर्वतयारी करूनच पुढे जायला हवं. यावेळी शारीरिक फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. यासोबत तुमची मानसिक तयारीही व्हायला हवी. गिर्यारोहणाआधी व्यायाम करा.
* डोंगरदर्याा पालथ्या घालण्यासाठी साधी पादत्राणं उपयोगी पडत नाहीत. यासाठी मजबूत आणि दमदार बूट घ्यायला हवे. हे बूट महागडे असले तरी ते आवश्यक आहेत हे लक्षात घ्या. उन्हाळ्यातल्या गिर्यारोहणासाठी स्टिफ बूट तर हिवाळ्यासाठी क्रँपन रेटेड बूट घ्या.
* हवामानाचा अंदाज घ्या. चढाईला सुरूवात करण्याच्या काही दिवस आधी जवळच्या गावात राहा. तिथल्या लोकांकडून परिस्थितीचा, बदलत्या वातावरणाचा अंदाज घ्या. सुरक्षेचे नियम पाळा. निसरड्या वाटांची माहिती घ्या.
* या प्रवासात तुमच्याकडे भरपूर खापदार्थ असायला हवेत. या हेतूने शारीरिक बळ आणि ऊर्जा देणारे पदार्थ सोबत ठेवा. पाठीवरच्या सॅकमध्ये मावतील असे पदार्थ घ्या. वेफर्स, बिस्किटं टाळा.
* तुमच्याकडे आपत्कालीन तंबू असायला हवा. गिर्यारोहण करताना वातावरण कधीही बदलूशकतं. त्यामुळे मध्येच थांबावं लागलं तर राहण्याची सोय असायला हवी.
* आवश्यक ती औषधं, क्रीम्स जवळ बाळगा. प्रथमोपचारांची पेटीही असायला हवी.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

पुढील लेख
Show comments