Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Winter Vacation Travel Tips :हिवाळ्यात फिरायला जातांना या गोष्टी लक्षात ठेवा

winter health tips
Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2023 (22:17 IST)
Winter VacationTravel Tips :नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात देशाच्या जवळपास सर्व भागात थंडी पडते. पूर्व भारतापासून पश्चिम भारतापर्यंत आणि उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत, नोव्हेंबर ,डिसेंबर महिन्यापासून सकाळी आणि संध्याकाळी सर्वात जास्त थंडी असते. यावेळी देशाच्या अनेक भागात बर्फवृष्टीही सुरू होते.
अनेकांना हिवाळ्यात फिरायला जाणे आवडते. हिवाळा सुरु झाल्यावर बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी लोक हिल स्टेशनवर जातात. पण हिवाळ्यात प्रवास करताना अनेक गोष्टींचा त्रास होतो. काही गोष्टी असतात जे हिवाळ्यात प्रवास करताना लक्षात ठेवायचा असतात जेणे करून प्रवासात काहीच त्रास होत नाही. चला तर मग या टिप्स जाणून घेऊ या.
 
ठिकाणा विषयी माहिती घ्या-
हिवाळ्याच्या मोसमात प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ज्या ठिकाणाला भेट देणार आहात त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती आणि हवामानाची माहिती मिळवा. तुम्हाला भूगोल आणि हवामानाविषयी माहिती असेल तर तुम्ही अनेक समस्या आधीच टाळू शकता. जर तुम्ही मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला हवामानाची माहिती असायलाच हवी.
 
हिवाळ्याचे कपडे घ्या- 
हिवाळ्यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हिवाळ्यातील कपडे. जर तुम्ही हिवाळ्यात बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी डोंगरावर जात असाल, तर तुम्ही 1-2 लोकरीचे कपडे, हातमोजे, बूट, ब्लँकेट, स्वेटर आणि शाल यासारख्या आवश्यक गोष्टी पॅक कराव्यात. याशिवाय, एक ब्लँकेट देखील निश्चितपणे पॅक करा. 
 
हॉटेलची आगाऊ बुकिंग करा-
उन्हाळ्यात तुम्ही सहजपणे कोणत्याही ठिकाणी राहू शकता, परंतु हिवाळ्यात नाही. अशा स्थितीत तुम्ही ज्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात तेथे पोहोचल्यानंतर हॉटेल शोधण्याची चूक करू नका. म्हणून, टूर आणि ट्रॅव्हल कंपनीच्या मदतीने किंवा ऑनलाइनद्वारे तुम्ही ज्या ठिकाणी भेट देणार आहात त्या ठिकाणी हॉटेल आधीच बुक करा. हॉटेल बुकिंग करताना सर्व सुविधांकडे लक्ष द्या.
 
आवश्यक औषधें सोबत घ्या-
तुमच्या काही औषधे असतील तर तेही सोबत घ्या, शिवाय सर्दी, तापाची औषधे ठेवा.
 
या गोष्टी लक्षात ठेवा- 
हिवाळ्यात बाहेर फिरायला जाण्याआधी, तुम्ही सर्वप्रथम तुमच्या पिशवीत थर्मो फ्लास्क ठेवा, कारण गरम पाणी, चहा किंवा कॉफीसाठी ते खूप महत्वाचे मानले जाते.
 
प्रवासादरम्यान तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असाल तर काचेचे दरवाजे असलेल्या वाहनातूनच प्रवास करा. अनेक वेळा, हिवाळ्यात मोकळ्या वाहनाने प्रवास केल्याने तुम्हाला वाऱ्याचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते.
 
तुम्ही तुमचे सामान इतके पॅक करू नका की बॅग उचलणे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे कठीण होईल.
सनग्लासेस ठेवा.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

सर्व पहा

नवीन

युट्यूबर रणवीर इलाहाबादियाने आपला पासपोर्ट जारी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली

सिकंदर ठरला वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर, पहिल्या दिवशी इतकी कमाई केली

कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यास सज्ज, ईदच्या दिवशी केली 'किस किस को प्यार करूं २' ची घोषणा

श्री गणेश मंडळात रामनवमी निमित्त रामायण गीत

'सिकंदर'ने ईदवर धुमाकूळ घातला, दुसऱ्या दिवशी ५५ कोटींचा आकडा ओलांडला

पुढील लेख
Show comments