Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पर्यटकांना आकर्षित करणारे 'बाली'

वेबदुनिया
ND
WD
इंडोनेशिया महाद्वीपाजवळ 'बाली' जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळापैकी एक आहे. 'बाली' हे जावा द्वीपापासून अगदी जवळ असून लोंबोक नदीच्या काठी वसले आहे. येथील बाली कला, नृत्य, प्रतिमा, चित्र, संगीत स ार्‍या जगात लोकप्रिय असून पर्यटकांना आकर्षित करत असते. येथील नैसर्गिक सौंदर् यही अद्‍भू त आहे.

बाली येथे विविध धर्माचे लोक वास्तव्य करीत आहे. येथील समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करणारे केंद्रबिंदू आहेत. येथील बीच्यावरील पां ढर्‍य ा वाळूवर हिंडण्यासाठी व अंगावर येण ार्‍या समुद्री लाटांशी खेळण्यासाठी पर्यटक येथे हिवाळा व उन्हाळ्यात दाखल होत असतात. जलक्रीडेचा आनंद पर्यटक मोठ्या संख्येने लुटताना दिसतात.

सानूर बी च
येथील सानूर बीच्यावर पर्यटकांना जलक्रीडा तसेच समुद्रावर पॅरासेलिंग करता येते. बीच्यावर येथील कलात्मक वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. तसेच रंग-बिरंगी कपडेही पर्यटकांचे लक्ष केंद्रित करतात. शांत समुद्र व चंद्राच्या मंद प्रकाशात संध्याकाळ घालवण्यासाठी पर्यटक येथे धम्माल करण्यासाठी येत असतात.

तुलांबेन
उत्तर समुद्र किन ार्‍य ावर अगंग पर्वतावर तुलांबेन हे गाव आहे. तुलांबेन परिसर 'लिबर्टी रेक साई ट' मध्ये मोडला जातो. येथे समुद्र तळापर्यंत
गोताखोरी केली जाते. उंच पर्वतावरून फेसाळत पडणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटक गुनुंग अगुंग तसेच सेराया पर्यंत चढून येतात व नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटतात. येथील रंग-बिरंगी फुले मनाला मोहून टाकतात.
WD
WD


कुटा बीच्यावर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी रिसोर्टमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथे पर्यटकांसाठी संगीत
कार्यक्रम, आधुनिक नृत्य कार्यक्रमातून वेगळी अशी मेजवानी दिली जात असते. येथे नाइट क्लब तसेच पबही आहेत.

कसे पोहचाल?
कोणत्याही देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देनपासार-नरूगा आंतर्राष्ट्रीय विमान तळावर उतरू शकतात. विमानतळापासून शहरात
येण्यासाठी बसेस तसेच खाजगी वाहन सहज उपलब्ध होत असते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments