Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुथिरपुझा, नल्लथन्नी व् कुंडल ह्यांच्या संगमावर वसलेले - मुन्नार

Webdunia
मंगळवार, 22 मार्च 2016 (10:51 IST)
हे त्या आकर्षणांपैकी एक आहे ज्याचे देशात आणि परदेशात पर्यटकांसाठी पर्यटन स्थळाच्या रूपात केरळच्या प्रसिद्धित मोठे योगदान आहे. 
 
तीन पर्वत रांगा- मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि कुंडल ह्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि समुद्रसपाटीपासून त्याची उंची अंदाजे 1600 मी आहे. मुन्नारचे हिल स्टेशन कधीकाळी दक्षिण भारताच्या पूर्वकालीन ब्रिटिश प्रशासनाचे उन्हाळी रिसॉर्ट होते. 
 
या हिल स्टेशनची ओळख आहे इथल्या विस्तिर्ण भू भागात पसरलेली चहाची शेती, वसाहती बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान. ट्रेकिंग आणि माउंटेन बाइकिंगसाठीही हे एक आदर्श स्थळ आहे. 
 
चला आता मुन्नार आणि आजूबाजूचे काही अन्य पर्याय शोधूया जे मुन्नारच्या मोहक हिल स्टेशनचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना पुरेशा संधी देतात. 
 
इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान
मुन्नार आणि त्याजवळील भागातील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान होय. हे उद्यान मुन्नारपासून साधारण 15 किमीदूर अंतरावर असून लुप्तप्राय होत चाललेला प्राणी –“नीलगिरी टार” साठी हे ओळखले जाते. 97 चौ.किमी अतंरापर्यंत पसरलेले हे उद्यान दुर्मिळ जातीची फुलपाखरे, वन्यजीव आणि पक्षांच्या अनेक दुर्लभ जातींचे आश्रयास्थान आहे. हे स्थान ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे. उद्यानातील चहाचे विस्तृत मळे आणि त्याचबरोबर पर्वतरांगावर वेढलेली धुक्याची दाट चादर यांचे एक मनमोहक दृष्य येथे पहावयास मिळते. 
 
नीलकुरिंजीच्या फुले फुलल्यानंतर जेव्हा पर्वताची उतरण जणु काही नीळ्या रंगाच्या चादरीने झाकली जाते ,तेव्हा तर हे उद्यान पर्यटकांसाठी प्रथम पसंतीचे ठरते. हे (नीलकुरिंजीचे) झाड पश्चिमी घाटातील या भागातील स्थानिक झाड आहे, ज्याला बारा वर्षातून एकदाच फुले येतात. याआधी 2006 साली याला फुले आली होती.
 
आनामुडी शिखर
आनामुडी शिखर हे इरवीकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या आतील भागात आहे. 2700 मीटरपेक्षा अधिक उंच असलेले हे शिखर दक्षिण भारतातील सर्वात ऊंच शिखर आहे. शिखरावर ट्रेकिंग करून चढण्यासाठी इरवीकुलम येथील वन आणि वन्यजीवन प्राधिकरण यांच्याकडून अनुमती घ्यावी लागते..
 
माट्टपेट्टी
मुन्नार शहरापासून दूर 13 किमी अंतरावर दुसरे एक आकर्षक स्थान आहे ते म्हणजे माट्टपेट्टी. हे समुद्रसपाटीपासून साधारण 1700 मीटर उंचावर आहे. माट्टपेट्टी हे मेसनरी धरणाचे स्टोरेज/आश्रयस्थान म्हणून तसेच सुंदर तलावासाठी ओळखले जाते.येथे पर्यटकांसाठी पर्वतरांगा आणि आजूबाजूची प्राकृतिक दृश्ये यांचा आनंद लुटताना सुखकर अशा नौकाविहाराची सोयही उपलब्ध आहे. माट्टपेट्टीच्या प्रसिद्धिचे श्रेय इंडो- स्विस लाइव्हस्टॉक परियोजनेद्वारा संचालित डेअरी उद्योगाला देखील जाते. येथे तुम्ही अधिक प्रमाणात दूध देणार्याप गायींच्या जाती पाहू शकता. हिरवेगार चहाचे मळे, वर-खाली असलेली गवताची कुरणे आणि शोला वनाबरोबरच माट्टपेट्टी हे ट्रेकिंगसाठी देखील आदर्श स्थळ आहे. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षांचे निवासस्थान म्हणून हे ठिकाण ओळखले जाते.
 
पल्लिवासल
पल्लिवासल हे मुन्नार मधील चितिरपुरमपासून साधारण 3 किमी दूर अंतरावर स्थित आहे. हे केरळमधील पहिले हायड्रो-इलेक्ट्रिक परियोजना स्थळ आहे. हे ठिकाण व्यापक प्राकृतिक सौंदर्याने बहरलेले आहे आणि पर्य़टकांचे आवडते सहलीचे स्थळ आहे.
 
चिन्नकनाल
चिन्नकनाल हे मुन्नार शहराच्याह जवळ असून येथील धबधबे हे पॉवर हाऊस वॉटरफ़ॉल या नावाने ओळखले जातात.या धबधब्याचे पाणी समुद्रसपाटीपासून 2000 मीटर उंच शिखरावरून खाली पडते. हे स्थळ पश्चिमी घाटातील पर्वतरांगांच्या नैसर्गिक दृष्यांनी समॄद्ध आहे. 
 
अनयिरंगल
चिन्नकनालपासून साधारण सात किमी अंतर जेव्हा तुम्ही पार करता तेव्हा अनयिरंगल हे ठिकाण लागते. मुन्नारपासून 22 किमी दूर अंतरावर असणारे अनयिरंगल हे चहाच्या हिरव्यागार झाडांचा जणुकाही गालिचाच आहे. येथील शानदार जलाशयाची सफ़र हा तर एक अविस्मरणीय अनुभवच ठरतो. अनयिरंगल धरण हे चारही बाजूंनी चहाचे मळे आणि सदाबहार अशा हरित वनांनी घेरलेले आहे.
 
टॉप स्टेशन
मुन्नारपासून साधारण 3 किमी दूर अंतरावर असलेले टॉप स्टेशन हे समुद्र सपाटीपासून 1700 मी. उंचीवर आहे.मुन्नार – कोडईकॅनाल मार्गावरील हे सर्वात उंच स्थान आहे. मुन्नारला येणारे पर्यटकदे खील टॉप स्टेशनला थांबून तेथून दिसणार्याा शेजारील तामिळनाडू राज्यातील विहंगम दृष्यांचा आनंद लुटतात. मुन्नारमध्ये विस्तृत प्रमाणात पसरलेली नीलकुरिंजीची फुललेली फुले पाहण्यासाठी देखील हे एक उपयुक्त स्थान आहे. 
 
चहा संग्रहालय
चहाच्या मळयांची उत्पत्ति आणि विकासाच्या दृष्टीने मुन्नारला आपली अशी एक स्वतंत्र परंपरा आहे. ह्या परंपरेला ध्यानात घेता, केरळमधील ऊंचच ऊंच पर्वतरांगांमधील चहाच्या मळ्यांची उत्पत्ति आणि विकासाच्या काही सूक्ष्म आणि आकर्षक पैलूंना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि प्रदर्शनीय ठेवण्यासाठी मुन्नारमध्ये टाटा टी द्वारा काही वर्षांपूर्वी एका संग्रहालयाची स्थापना केली गेली. या चहा संग्रहालयामध्ये दुर्लभ कलाकृती, चित्रे आणि यंत्रे ठेवली गेली आहेत ज्यांना स्वतःची अशी वेगळी कहाणी आहे. ही सर्व मुन्नारमधील चहाच्या मळ्यांची उत्पत्ति आणि विकासाच्या बाबत सांगतात. हे संग्रहालय टाटा टीच्या नल्लथन्नी इस्टेट पैकी एक दर्शनीय स्थळ आहे. येथे जरूर जा.
 
येथे पोहोचण्यासाठी:
जवळील रेल्वे स्थानके: थेनी (तामिळनाडू), साधारण 60 किमी दूर; चेंगनचेरी, साधारण 93 किमीदूर
जवळचा विमानतळ: मदुराई (तामिळनाडू), साधारण 140 किमी दूर; कोचिन, साधारण 190 किमीदूर.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments