Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वोत्तम ठिकाण पेहेलगाम

वेबदुनिया
शुक्रवार, 25 मे 2012 (16:40 IST)
WD
पेहेलगामला जाऊन तुम्ही जगातल्या अशा सर्वोत्तम ठिकाणी पोचता की‍ जिथे मन व शरीर अगदी तणावरहित करून घेता येते. इधले आल्हाददायक वातावरण, सुखद हवामान, प्रेमात पडावा असा निसर्ग या त्रयींची लयलूट. शिवाय राहण्या-खाण्याची चोख व्यवस्था असलेली रेसॉर्टस आणि जोडीला काश्मिरी आदब तुमचे मन खूश करून टाकते. लीडर नदी आपली साथ न सोडता अखंडपणे खळखळत वातावरत अजूनच रोमॅटिक करते व हळूच आपल्याला पुन्हा आपल्या तार ुण्यात नेऊन सोडते.

हा भाग ट्रेकिंग झोन गणला जातो. इथल्या धनगर वस्तीमुळे गरम कपडे, शाली, स्वेटर्स खूप बघायला मिळतात. इथली रिसॉर्टस-हॉटेल्स उत्कृष्ट आहेतच! त्यातील टपेस्ट्री काश्मिरी विणकरांची कलाकुसर दाखवते. तर इमारतीतील फर्निचर वर आक्रोडच्या लाकडाचे कोरीव काम उठून दिसते. रिसॉर्टसवर पोहचल्या-पोहचल्या गरमा गरम केशरमिश्रित, बदाम-आक्रोडयुक्त दूध व चहा तुमचा प्रवासाचा शीण पळवून लावतो. जेवणात तर पदर्थांसोबत काश्मिरी केशर पुलाव मनसोक्त खाऊन उबदार पांघरुणात छानशी वामकुशी घेऊन मनही ताजेतवाने होऊन जाते व निसर्गाच्या सुंदर लडींचे आकंठ पान करायला तयार होते. सोबतीला लीडर नदी व उन्हात चमकणारी हिमशिखरे बघत बघत आपण पेहेलगाम बाजार पालथा घालतो व ते अवर्णनीय सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवायचा प्रयत्न करीत असतो.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments