Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुवर्ण मंदिराचे शहर अमृतसर

Webdunia
NDND
शीखांचे चवथे गुरू रामदास यांनी 16 व्या शतकात एका सरोवराकाठी बस्तान बसवले. सरोवराच्या पाण्यात अद्‍भूत शक्ती होती. यावरून या सरोवराच्या काठी वसलेल्या शहराचे नाव अमृत+सर (अमृताचे सरोवर) असे पडले आह े.

गुरु रामदास यांच्या मुलाने या सरोवराच्या मध्यभागी एक मंदिर बांधले. तेच सुवर्ण मंदिर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. येथे एप्रिल महिन्यात बैसाखी नामक पर्व मोठ्या जल्लोषात साजरे केल जाते.

अमृतसरमध्ये काय पहाल?
सुवर्ण मंदिर- जगातील शीख बांधवाचे हे धार्मिक स्थळ आहे. या मंदिराला हरी मंदिरही म्हटले जाते. मंदिराच्या कळसाला शुद्ध सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे.

दुर्गियाना मंदिर- हे हिंदु बांधवाचे धार्मिक स्थळ असून म‍ंदिराच्या कळसाला सोने व चांदी मुलामा लावण्यात आला आहे.

जलियनवाला बाग- सन 1919 मध्ये ब्रिटीश सरकारचा उद्दाम अधिकारी जनरल डायरने येथे सुमारे 2000 भारतीयांना गोळ्या घालून ठार केले होते. या दुःखद घटनेचे स्मरण होण्यासाठी येथे मोठे स्मारक उभारण्यात आले आहे.

बाबा अटल राय स्तंभ- गुरु हरगोविंदसिंग यांच्या नऊ वर्षीय मुलाचे हुतात्मा स्मारक आहे.

तरणतारण- अमृतसरपासून 22 कि.मी. अंतरावर तरणतारण नावाचा एक तलाव आहे. या तलावाच्या पाण्यात अनेक प्रकारचे आजार दूर करण्याची औषधी शक्ती असल्याचे मानले जाते.

रामतीर्थ- रामतीर्थ हे प्रभु रामचंद्र यांची मुले लव व कुश यांचे जन्मस्थळ मानले जाते.

* येथील विमानतळ शहरापासून 11 कि. मी अंतरावर आहे.
NDND

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments