Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पक्षाच्‍या 'शस्त्रक्रिये'चे गडकरींचे संकेत

गडकरींचे पक्षाच्या शस्त्रक्रियेचे संकेत
अभिनय कुलकर्णी
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2010 (10:55 IST)
PTI
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे केवळ काही पदाधिका-यांची गर्दी किंवा नुसत्या चर्चाचे व्‍यासपीठ नसून अडचणीतून जात असलेल्‍या पक्षाची स्थिती सुधारण्‍यासाठी आवश्‍यक ते सर्व करण्‍याचे संकेत पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी पहिल्‍याच दिवशी दिले आहेत. आपल्‍या भाषणातून गडकरींनी पक्षाच्‍या ज्येष्‍ठ आणि बड्या नेत्यांचे ज्या पध्‍दतीने कान उपटले ते पाहता गडकरी पक्षाची 'सर्जरी' करणार हे नक्की झाले आहे.

भाजपच्‍या निर्णय प्रक्रियेत संघाची भूमिका नेहमीच महत्‍वाची असते. ही भूमिका केवळ अध्यक्ष निवडीपुरती मर्यादीत राहत नसून पक्षाची स्थिती सुधारण्‍यासाठी काय केले पाहिजे ते करण्‍यापर्यंतही असते. त्‍यामुळे काही दिवसांपूर्वी 'पक्षाला सर्जरीची आवश्‍यकता आहे' असे म्हणणा-या सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍या पठडीतून तयार झालेले नागपूरचे गडकरी सर्जरी करतील हे आता निश्चित. गडकरी यांना अध्यक्ष बनवणे हा देखिल संघाचाच निर्णय.

गडकरी संघाशी संबंधित असल्‍याने त्यांना पक्ष चालवताना कुठलीही अडचण येऊ नये याची खबरदारीही संघ घेणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला दिलेला केमोथेरेपीचा सल्‍ला किती ठाम होता हे गडकरींच्‍या आजच्‍या भाषणातून स्‍पष्‍ट लक्षात येऊ शकतो.

गडकरी यांनी आज पक्षाच्‍या ज्‍येष्ठ आणि बड्या नेत्‍यांना स्पष्ट शब्‍दात संकेत दिले अहोत, की पक्षाच्‍या प्रगती आड आलात तर सोडणार नाही. या व्‍यतिरिक्त नाराज नेत्‍यांचीही त्यांनी कान उघाडणी केली. पक्षासाठी अडचणी निर्माण करणारे मोठे नेतेच असतात असे बोलून त्यांनी एकाच बाणात अनेकांना घायाळ केले आहे. यात अरूण जेटलींपासून ते वसुंधरा राजे पर्यंतच्‍या नेत्यांचा समावेश आहे. यामुळे सरसंघचालक भागवत यांनी दाखविलेल्‍या रस्‍त्यावरून जाणारे गडकरी काय करू शकतात हे त्यांच्‍या एका तासाच्‍या भाषणातूनच स्‍पष्‍ट झाले आहे. त्यामुळे गडकरी भाजपचा 'गड' राखतील असे सध्‍या तरी वाटते.
सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सोमवारी कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरवरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या वादाचा निषेध केला

LIVE: औरंगजेबाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे एक नवीन विधान समोर आले

'पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी शोधण्याची गरज नाही', संजय राऊतांना मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिउत्तर

औरंगजेब आवडो किंवा न आवडो त्याची कबर एक संरक्षित स्मारक आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान समोर आले

Show comments