Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'खास' मित्रासाठी धावत आली अनुष्का

वेबदुनिया
PR
मुंबई : अनुराग कश्यपच्या 'बॉम्बे वेलवेट' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी श्रीलंकेला गेलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या 'खास' दोस्ताला भेटण्यासाठी तातडीने मुंबईला परतली आहे. त्यासाठी तिने चित्रीकरणातून दोन दिवसांची सुट्टीही काढली आहे. ज्याच्यासाठी एवढय़ा लगबगीने मुंबई गाठावी लागली, तो अनुष्काचा खास मित्र आहे तरी कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. अनुष्काचा हा खास मित्र म्हणजे टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली असेल, असाच अंदाज बहुतेकांनी लावला असेल. मात्र तुम्हीही असाच विचार करत असाल तर एकदम चूक आहात. कारण अनुष्का श्रीलंकेहून विराटसाठी धावतपळत मुंबईला परतली नाही तर तिचा मित्र कुणीतरी वेगळाच आहे. तिचा हा खास दोस्त सहा महिन्यांचा लॅब्रेडोर कुत्रा आहे. त्याला ती प्रेमाने 'डूड' म्हणून बोलावते व त्याच्यासाठीच चित्रण सोडून ती एवढय़ा लांब आली आहे. डूडपासून फार दिवस दूर राहिल्यास तो आपल्याला विसरून जाईल, अशी भीती तिला वाटत होती. म्हणूनच चित्रीकरणातून दोन दिवसांची सुट्टी घेत तिने श्रीलंकेहून थेट मुंबई गाठली आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments