Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

100 कोटींच्या पार गेला ’बाजीराव..’

Webdunia
मंगळवार, 29 डिसेंबर 2015 (14:50 IST)
रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा स्टारर ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाने भारतात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सिनेमाने दुसर्‍या आठवडय़ात शुक्रवारी 12.25 कोटी आणि शनिवारी 10.30 कोटींचा गल्ला जमवला आहे. 
 
भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 108.7 कोटी रुपये कमावले आहेत. ट्रेड अँनालिस्ट तरण आदर्श यांच्या सांगण्यानुसार, ‘बाजीराव मस्तानी’ लवकरच ‘दिलवाले’ला मागे टाकू शकतो. 
 
त्यांनी ट्विटरवर लिहिले, ‘The tables have turned. BajiraoMastani leads, Dilwale slows. Gap between the total narrows. BajiraoMastani to overtake soon. India biz.' ‘दिलवाले’ने दुसर्‍या शुक्रवारी 8 कोटींची कमाई केली आहे. ही ‘बाजीराव मस्तानी’च्या दुसर्‍या शुक्रवारच्या तुलनेत 4.25 कोटींनी कमी आहे. संजय लीला भन्साळीच्या दिग्दर्शनामध्ये बनलेला ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमा यावर्षीच्या 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवणारा 7वा सिनेमा आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments