बॉलिवूड अभिनेता आमिर खानने नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. आमिरने मुंबईतील पॉश भाग असलेल्या पाली हिलमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केले आहे.हे अपार्टमेंट एका आलिशान इमारतीत आहे. आमिर खान आपल्या या नव्या प्रॉपर्टीमुळे चर्चेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान ने मुंबईतील आलिशान पाली हील परिसरात एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. ज्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. आमिरची ही नवी प्रॉपर्टी रेडी टू मूव्ह आहे. त्याचा आकार 1,027 स्क्वेअर फूट आहे. आमिर ने या नवीन घराची नोंदणी केली आहे.
आमिर खानची नवीन मालमत्ता पाली हिल परिसरातील बेला विस्टा अपार्टमेंटमध्ये आहे. या मालमत्तेशिवाय आमिर खानकडे पाली हिल येथे असलेल्या मरिना अपार्टमेंटमध्ये एक आलिशान फ्लॅट आहे.
पाली हिल्समधील बेला व्हिस्टा आणि मरीना येथे आमिरचे
अनेक अपार्टमेंट्स आहेत आणि दोन्ही ठिकाणांना फेसलिफ्ट देण्यात येत आहे. नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर आमिरचे मुंबईतील एका पॉश भागात एक आलिशान घर आहे. 2009 मध्ये त्यांनी ते विकत घेतले. त्यावेळी या घराची किंमत 18 कोटी रुपये होती. त्यात दोन मजले आहेत. घरात एक मोठा खुला भाग आहे, जिथे पार्टी आणि कार्यक्रम आरामात आयोजित केले जाऊ शकतात.
आमिर खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो अभिनेत्याच्या आगामी 'सीतारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याची सहकलाकार जेनेलिया डिसूजा असणार आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.