Festival Posters

अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग

Webdunia
मुंबई- लोकप्रिय दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग लागल्याची माहिती समोर येते आहे. त्यांच्या अहमदनगर येथील घराला आग लागल्याची बातमी आहे. 
 
अहमदनगर येथे अमरापूरकर यांच्या फ्लॅटला अचानक आग लागली. ही आग इतकी वाढली की अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी उपस्थित झाल्याने मोठी हानी टळली. कर्मचाऱ्यांनी फ्लॅटमध्ये अडकलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढल्याचे सांगितले जात आहे.
 
हा फ्लॅट सुनंदा सदाशिव अमरापुर यांच्या नावाने असून यात एक भाडेकरू राहत होत्या. ज्योती भोर पठाणे असे त्यांचे नाव असून त्या या घटनेत किरकोळ जखमी झाल्या आहेत. आग लागली तेव्हा ज्योती या फ्लॅटमध्ये अडकल्या होत्या. त्यांना अग्निशमनदलाच्या जवानांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 
 
अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटला 12 डिसेंबर रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

जॉन अब्राहमच्या धक्कादायक परिवर्तनाने चाहते थक्क; एका मोठ्या चित्रपटाची तयारी करत आहे का?

रणवीर सिंहविरोधात FIR दाखल

दीपिका- रणवीर जिवलग मैत्रिणीच्या लग्नासाठी न्यू यॉर्कमध्ये पोहोचले, लग्नाच्या ग्लॅमरमध्ये भर पडली, फोटो पहा

रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा चित्रपटाने इतिहास रचत १००० कोटी क्लबमध्ये सामील होणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला

गर्दीपासून दूर कुठेतरी जायचंय? कोकणातील 'ही' समुद्रकिनारे अजूनही पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे

पुढील लेख
Show comments