Actor Saif Ali Khan news : गुरुवारी पहाटे 2.30 वाजता बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या वांद्रे पश्चिम येथील घरी मोठी चोरी झाली. चोरीदरम्यान सैफ अली खानवरही चाकूने हल्ला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या वांद्रे पश्चिम येथील घरी गुरुवारी पहाटे 2.30 वाजता मोठी चोरी झाली. चोरीदरम्यान सैफ अली खानवरही चाकूने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली, असे सूत्रांनी सांगितले. चोराशी झालेल्या झटापटीत त्याला आधी चाकूने वार करण्यात आले की तो जखमी झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखा दोघेही या प्रकरणाचा तपास करत आहे. वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहे. तसेच करीना कपूर आणि तिची मुले सुरक्षित आहे. कुटुंबाने अद्याप या घटनेबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. सुरुवातीच्या तपासानंतर, पोलिस लवकरच या प्रकरणाची माहिती देऊ शकतात. घराभोवती बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
घटनेच्या वेळी, अभिनेता त्याची पत्नी करीना आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह घरात झोपला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता पण सैफला जाग आल्यावर त्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि पळून गेला. पोलीस आता त्याचा शोध घेत आहे. अशी माहिती समोर आली आहे.
तसेच रुग्णालयात दाखल केल्यांनतर सैफच्या मानेवर १० सेमी लांब जखम झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याच्या हाताला आणि पाठीलाही दुखापत झाली आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर मागून एक धारदार वस्तू काढण्यात आली. अशी माहिती समोर आली आहे.