Festival Posters

अभिनेते टॉम अल्टर यांना त्वचेचा कॅन्सर

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (11:27 IST)

ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांना त्वचेचा कॅन्सर झाला असून तो चौथ्या स्टेजला पोहचला आहे. टॉम अल्टर यांचे पुत्र जेमी यांनी माहिती याबाबत  दिली आहे. सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

टॉम अल्टर यांनी वीर-झारा, भेजा फ्राय, विरुद्ध, अलग, बोस, यासरख्या तीनशेपेक्षा अधिक चित्रपटात लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत. जुनून, शक्तिमान, जबान संभालके यासारख्या टीव्ही मालिकांतील त्यांच्या व्यक्तिरेखाही गाजल्या आहेत. दप्तर या मराठी चित्रपटातही अल्टर झळकले होते. त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.

80 च्या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिता केली असून भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी सचिन तेंडुलकरची टीव्हीसाठी मुलाखत घेणारे ते पहिलेच मुलाखतकार ठरले आहेत. अल्टर यांनी तीन पुस्तकांचं लेखनही केलं आहे.  कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी 2008 मध्ये टॉम अल्टर यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

सर्व पहा

नवीन

चित्रपट Border 2 ला जबरदस्त रिस्पॉन्स

आखाती देशांमध्ये 'बॉर्डर २' प्रदर्शित होण्यास नकार, धुरंधरनंतर सनी देओलच्या चित्रपटावर बंदी

Vasant Panchami Tourist Places वसंत पंचमीला भेट देण्यासाठी 5 सर्वोत्तम ठिकाणे

'The Lion King' फेम डायरेक्टरचे निधन

प्रसिद्ध खलनायकाचे दुर्दैवी निघन

पुढील लेख
Show comments