Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदिपुरुषचा खेळ नालासोपाऱ्यात हिंदू संघटनेने पाडला बंद

Webdunia
सोमवार, 19 जून 2023 (14:28 IST)
आदिपुरुष चित्रपटावरून वाद शमण्याची चिन्हं नाहीत. पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा इथे हिंदू संघटनेनं आदिपुरुष चित्रपट लागलेल्या थिएटरमध्ये गोंधळ घातला. चित्रपट सुरू असतानाच संघटनेचे लोक थिएटरमध्ये घुसले आणि त्यांनी खेळ थांबवला. घोषणाबाजी केली. त्यांनी थिएटर प्रशासनाच्या लोकांशी हुज्जतही घातली.
 
रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावर तर प्रतिक्रिया, मीम्स यांचा अक्षरश: पाऊस पडताना दिसतोय.
 
ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात रामाच्या भूमिकेत अभिनेता प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन, हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे, तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे.
 
रामायण हे भारतात आस्थेचं केंद्र आहे. रामायणाला कुणी महाकाव्य म्हणतं, कुणी कथा म्हणतं, कुणी इतिहास म्हणतं. यात मतमतांतरं असली तरी रामायणाचं भारतीय जनमानसांत अढळ स्थान आहे, हे सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे.
 
त्यामुळे रामायणावर आधारित गोष्टींबाबत उत्सुकता आणि चर्चा भारतात दिसणं साहजिक आहे आणि ते ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या निमित्तानंही दिसून आलं.
 
सिनेमाच्या ट्रेलरनंतरच खरंतर चर्चेला तोंड फुटलं होतं. मात्र, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमावरील आपापली मतं सोशल मीडियाच्या आधारे मांडताना दिसतायेत. यात अनेकांचा सूर टीकेचा दिसून येतो.
 
‘आदिपुरुष’ सिनेमा नियोजित वेळेच्या उशिरा प्रदर्शित होण्याचं कारणच मुळात ग्राफिक्समधील सुधारणा हे सांगण्यात आलं होतं आणि आता या सिनेमावरील टीकेचा सर्वात मोठा निशाणा ग्राफिक्सच बनलंय.
 
‘आदिपुरुष’ सिनेमाच्या शो दरम्यान एक सीट हनुमानाच्या नावानं रिकामी ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती. हाच धाग पकडत ट्रेंडुलकर नावाच्या ट्विटर युजरनं टोला लगावला आहे.
 
डॉ. पूजा त्रिपाठी यांनी या सिनेमात पात्रांना जसं दाखवण्यात आलंय, त्यावरून टीका केलीय.
 
आदिपुरुष प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेची आठवण काढत आहेत.
 
राजस्थानमधील जगदगुरु रामाननंदाचार्य राजस्थान संस्कृत विद्यापीठातील तत्वज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्री कोसलेन्द्रदास यांनीही टीका केलीय.
 
आशिष सिंग नामक ट्विटर युजरनं मीम शेअर करत सिनेमा पाहायला आल्यानं अडकल्याची भावना व्यक्त केलीय.
 
जितेंद्र रायकर नामक फेसबुक युजरनं हे मीम शेअर केलंय.
 
अंकित यादव नामक फेसबुक युजरनं आदिपुरुष सिनेमातील हा फोटो शेअर करत म्हटलंय की, "किचन में जगह कम होने की वजह से, एक के ऊपर एक रखे मसालों के डिब्बे…"
 
 
पुणेरी टोमणे या फेसबुक पेजवर हे मीम पोस्ट करण्यात आलंय.
 
वरिष्ठ पत्रकार नरेंद्र नाथ मिश्रा यांनी आदिपुरुष सिनेमातील संवादाचा उल्लेख करत म्हटलंय की, ज्यानं हे संवाद लिहिलेत, ते भावनांना धरून नाहीत.
 
सोल्जर नामक ट्विटर युजरनं सलमान खानचा उल्लेख करत आदिपुरुष सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत याला टोमणा मारला आहे.
 
नेपाळमध्येही 'आदिपुरुष'वरून वाद
 
आदिपुरुष चित्रपटात सीतेला 'भारत की बेटी' संबोधण्यावरून शेजारी देश नेपाळमध्ये वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
 
या संवादांवर काठमांडूच्या महापौरांनी आक्षेप घेतला असून तत्काळ तो हटवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
 
सीतेचा जन्म नेपाळच्या जनकपूरमध्ये झाल्याचा दावा नेपाळकडून केला जातो. यामुळेच नेपाळमध्ये या डायलॉगवरून वाद सुरू झाला.
 
नेपाळचे महापौर बालेंद्र शाह म्हणाले, “आदिपुरुष चित्रपटात सीतेला भारत की बेटी संबोधल्याचा डायलॉग हटवला जात नाही, तोपर्यंत कोणताही हिंदी चित्रपट काठमांडूमध्ये चालवू दिला जाणार नाही.”
 
ही चूक सुधारण्यासाठी बालेंद्र शाह यांनी निर्मात्यांना 3 दिवसांची मुदत दिली.
 
नेपाळच्या सेन्सॉर बोर्डचे सदस्य ऋषिराज आचार्य म्हणाले, “आम्ही बुधवारी चित्रपट पाहिला. त्यावेळी आम्ही वितरकांना सांगितलं की डायलॉग हटवल्यानंतरच आम्ही त्याच्या स्क्रिनिंगसाठी परवानगी देऊ शकतो.”
 
नेपाळमध्ये चित्रपटातून हा डायलॉग कापण्यात आल्याचं आचार्य यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, “आम्ही नेपाळमध्ये दाखवण्यात येत असलेल्या शोमधून तो भाग वगळला आहे. पण सर्वच आवृत्तींमधून हा भाग वगळण्यात आला पाहिजे.
 








Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

सर्व पहा

नवीन

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स

राजकारणात ही मान-अपमान, 'संगीत मानापमान'च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मजेदार गोष्टी शेअर केल्या

प्रसिद्ध गायक शान यांच्या मुंबईतील निवासी इमारतीला भीषण आग

ख्रिसमस बजेटमध्ये साजरा करायचा आहे, या ठिकाणांना नक्की भेट द्या

पुढील लेख
Show comments