Festival Posters

'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर रिलीज, प्रभास दिसला राम अवतारात

Webdunia
सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (12:06 IST)
साऊथ सुपरस्टार प्रभासचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'आदिपुरुष'चा टीझर रिलीज झाला आहे. अयोध्येत एका शानदार सोहळ्यात चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. समोर आलेल्या टीझरमध्ये प्रभास भगवान राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसत आहे.
 
‘आदिपुरुष’चित्रपटाची कथा रामायणापासून प्रेरित आहे. टीझरची सुरुवात प्रभासच्या आवाजाने होते. तो म्हणतो, 'ही पृथ्वी कोसळली किंवा हे आकाश तुटले तर न्यायाच्या हातून अन्यायाचा नायनाट होईल. मी येतोय, मी येतोय, अन्यायाची दहा डोकी दोन पायांनी चिरडून टाकायला. मी अधर्माचा नाश करायला येत आहे.'
 
टीझरमध्ये लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान खूपच दमदार दिसत आहे. टीझरमध्ये हनुमान, सुग्रीव, बली आणि जटायू देखील दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात क्रिती सेनन माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
आदिपुरुष या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

Ajit Pawar's Death चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला

पार्श्वगायक अरिजीत सिंगने पार्श्वगायनाला निरोप दिला

ओशिवरा गोळीबार प्रकरणात कमाल रशीद खान न्यायालयीन कोठडीत, मुंबई न्यायालयाने जामीन नाकारला

मुंबई-पुण्याजवळच्या 'या' ५ जागा, जिथे तुम्ही एका दिवसात पिकनिक करून परत येऊ शकता

"वध २" चा ट्रेलर प्रदर्शित; संजय मिश्रा आणि नीना गुप्ता पुन्हा एकदा भीती आणि भावनांचा खेळ रचणार

पुढील लेख
Show comments