Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमिताभ बच्चन बनले मुंबई टीमचे मालक

Webdunia
मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (08:25 IST)
बॉलिवूडकरांचे क्रिकेट प्रेम काही केल्या लपत नाही. अनेक सेलिब्रिटीही क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये सेलिब्रिटी टीमला चिअर करताना दिसतात. काही सेलिब्रिटी क्रिकेट टीमचे मालकही आहेत.
 
शाहरुख खान, प्रीती झिंटानंतर अक्षय कुमारनेही क्रिकेट टीम विकत घेतली होती. आता अक्षय कुमार पाठोपाठ बिग बी अमिताभ बच्चनही क्रिकेट टीमचे मालक झाले आहेत.

अमिताभ यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीग म्हणजेच आयएसपीएल मधील मुंबईची टीम विकत घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बिग बींनी ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे आता अमिताभ बच्चनही क्रिकेट टीमचे मालक झाले आहेत.
 
मुंबई महाराष्ट्र टीमचा मालक झाल्यानंतर बिग बींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ‘मुंबई टीमचा मालक होणे ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. इस पहल की चहल, जिंदाबाद… जय हो! जय हिन्द’, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, अक्षय कुमारने आयएसपीएलमधील श्रीनगर ही टीम खरेदी केली आहे. 2 ते 9 मार्च 2024 दरम्यान इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगमधील सामने खेळवले जाणार आहेत. या लीगसाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रियांका चोप्राच्या 'पानी'चा टीझर लाँच

होंबळे फिल्म्सचा 'बघीरा' चित्रपटगृहांमध्ये या दिवशी खळबळ माजवणार

Ayushmann Khurrana :आयुष्मान अभिनय आणि गायन, कविता लिहिण्याची चांगली आवड ठेवणारा अभिनेता

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट, म्हणाली-आमचे कुटुंब धक्क्यात आहे

दीपिका रणवीर एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले

सर्व पहा

नवीन

लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ चित्रपटगृहात

सलमान खानने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बहीण अर्पितासोबत गणेश चतुर्थी साजरी केली

अभिनेत्री आदिती राव हैदरी सिद्धार्थ लग्न बंधनात बंधले

शर्वरीच 'अल्फा' साठी मंडे मोटिवेशन , राउंड 3 साठी तयार!

मोती डुंगरी गणेश मंदिर जयपूर

पुढील लेख
Show comments