Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाढदिवस विशेष: 'अनुष्का'च्या पहिल्या आठवणी

Webdunia
अनुष्का शर्मा आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयासोबतच निर्माता म्हणून तिने आपली वेगळी ओळख पटवून दिली आहे. तिचे फिल्मी करिअर नऊ वर्षाचे झाले असून आपल्या वाढदिवसापूर्वी तिने स्वत:बद्दल काही मनोरंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. बघू या काय आहे त्या:
पहिले असाईनमेंट- वयाच्या 14 व्या वर्षी एका शू ब्रँडसाठी मी जाहिरात केली होती. तेव्हा मला पहिला चेक मिळाला होता.
पहिले क्रश: मी तिसरी वर्गात असताना एका मुलावर माझे क्रश झाले होते. पण मी त्याचे नाव सांगणार नाही.
स्वत:च्या कमाईची पहिले खरेदी: आधी तर पैसे आईला दिले होते नंतर झुमके खरेदी करण्यासाठी पुन्हा मागून घेतले.
पहिली कार: 18 वर्षाची असताना स्वत:ची पहिली कार खरेदी केली.
पहिले घर: 2009 मध्ये मी आपले पहिले घर खरेदी केले होते. मुंबईच्या वर्सोवामध्ये या घरात राहणारी मी पहिली नव्हती. येथे आधी अजून कुणीतरी राहत होते.
पहिले परदेशातील यात्रा: मी पहिल्यांदा एका फॅशन शोमध्ये भाग घेण्यासाठी श्रीलंका येथे गेले होते.
पहिले स्टेज परफॉर्मेंस: 2009 मध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड दरम्यान मी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केले होते.
पहिला अवॉर्ड: निर्माता गिल्ड यांनी बेस्ट डेब्यू अवॉर्ड दिला होता.
पहिले प्रेम: माझा डॉगी
पहिला ‍ड्रीम मॅन: तो ड्रीममध्ये आहे तर आपल्याला कसा कळेल?
स्वत: बनवलेला पहिला पदार्थ: मी जेवण बनवत नाही तरी बनवलं तर नक्कीच चांगलंच बनवेन. परंतू मी कुकीज बनवल्या आहेत.
पहिला प्रपोज: मी सहावीत असताना मला एका मुलाने प्रपोज केले होते. तेव्हा हे प्रपोजल नेमके काय असतं तेही मला कळतं नव्हतं.
पहिला चापट किंवा मारहाण- एक मुलाने माझी छेड काढल्यावर मी त्याला बॉटल फेकून मारली होती. मी माझ्या भावाची भांडताना त्याला चापट लावली होती आणि त्याचे केसही ओढले होते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments