suvichar

अरशद वारसी बनणार फ्रॉड सैया

Webdunia
शनिवार, 1 डिसेंबर 2018 (15:17 IST)
बॉलिवूडमध्ये आपल्या कॉमिक अभिनयासाठी प्रख्यात असलेला अरशद वारसी हा सिल्व्हरस्क्रीनवर फ्रॉड सैया बनणार आहे. बॉलिवूड फिल्मकार प्रकाश झा सध्या फ्रॉड सैया बनवत आहेत. या चित्रपटामध्ये अरशद वारसी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटामध्ये अरशद एकदा-दोनदा नव्हे, तर तब्बल तेरा वेळा विवाह करणार आहे. हा चित्रपट फसवणुकीवर आधारित आहे. चित्रपटामध्ये अरशद एका अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारत आहे, जो महिलांशी विवाह करून त्यांची फसवणूक करतो. तो अशा महिलांना टार्गेट करतो, ज्यांचे वय झालेले असते, परंतु विवाह झालेला नसतो. सौरभ शुक्ला यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाचे बहुतेक शूटिंग भोपाळमध्ये होणार आहे. प्रकाश झा यांनी सांगितले की, त्यांना या चित्रपटाची आयडिया त्यांची मुलगी दिशा व बिझनेस पार्टनर कनिष्क यांच्याकडून मिळाली आहे. हा चित्रपट एका वास्तववादी धोकेबाजाद्वारे प्रेरित आहे, ज्याने विविध शहरे व गावांमध्ये सात महिलांबरोबर विवाह केला होता. विवाह करण्याचा हा फंडा अरशदला चित्रपटामध्ये अनेक अडचणींत टाकताना दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 18 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा: कट कुठे रचला गेला होता? पोलिसांनी तपशील शेअर केला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आईचे नाव का जोडले?

सुबेदार'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अॅक्शन करताना दिसले

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

सर्व पहा

नवीन

प्रेमानंद महाराजांच्या भेटीनंतर पूनम पांडे रडली

संजय लीला भन्साळी रुग्णालयात का गेले? कुटुंबाने निवेदन जारी करून गुपित उलगडले

महाराष्ट्रात रंगपंचमीचा खरा आनंद लुटायचा असेल तर या ३ विशेष ठिकाणांना नक्की भेट द्या

अक्षय कुमारच्या "भूत बांगला" मधील "रामजी आके भला करेंगे" या गाण्याचा टीझर प्रदर्शित

विजय-रश्मिकाच्या लग्नात पाहुण्यांना जपानी जेवण मिळणार, 'नो फोन' धोरण लागू

पुढील लेख
Show comments