Dharma Sangrah

Ashish Vidyarthi Wedding: वयाच्या 60 व्या वर्षी आशिष विद्यार्थीचे दुसरे लग्न

Webdunia
गुरूवार, 25 मे 2023 (17:27 IST)
बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक आशिष विद्यार्थी याने वयाच्या 60  व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. आशिष विद्यार्थ्याचे लग्न आसाममधील रुपाली बरुआशी झाले आहे. दोघांनी कोर्ट मॅरेज केले आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षावही सुरू झाला आहे. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर समोर आले, ज्याला पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. ही छायाचित्रे इंटरनेटवर येताच ती आगीसारखी पसरली.
  
 रुपालीला आशिष कसे भेटले ?
रुपालीच्या भेटीबाबत आशिष म्हणाला की, ही खूप मोठी गोष्ट आहे. TOI च्या बातमीनुसार, त्यांनी सांगितले की मीटिंग कशी झाली ते नंतर सांगेन. तो म्हणाला, “आम्ही कधीतरी भेटलो आणि नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. पण आम्हा दोघांची इच्छा होती की लग्नात फार धामधूम नको, फक्त कुटुंब राहिलं पाहिजे.
 
आशिष विद्यार्थ्याला जोडीदार बनवल्यानंतर रुपाली बरुआ म्हणाली की, तो एक सुंदर व्यक्ती आहे आणि त्याच्यासोबत राहून छान आहे.
 
चित्रपट कारकीर्द कशी आहे
आशिष विद्यार्थी यांनी 1991 मध्ये काळ संध्या या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आपल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी व्यतिरिक्त तेलुगु, तमिळ, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, मराठी आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये चित्रपट केले. द्रोहकल चित्रपटात आशिषला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

अल्लू अर्जुनपासून ते हृतिक रोशनपर्यंत, भारतातील टॉप ट्रेंडसेटिंग डान्सिंग सुपरस्टार्स

Shri Laxmi Narsimha Nira Narsingpur श्री क्षेत्र नीरा नृसिंहपुर पुणे

भारतीय मनोरंजन उद्योगातील एक प्रभावी शक्ती संजय लीला भन्साळी यांची ७ अविस्मरणीय नृत्य दृश्ये जी मनाला भिडतात

पती पत्नी और वो दो' गोंधळ आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल, आयुष्मान खुरानाने केला खुलासा

संजय दत्तच्या 'आखरी सवाल'चा ट्रेलर एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित होणार; निर्मात्यांची घोषणा

पुढील लेख
Show comments