Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मा यांचे वयाच्या 24 व्या वर्षी कार्डिअक अरेस्टने निधन

Webdunia
सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (11:11 IST)
बांग्ला चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे.अभिनेत्री एंड्रिला शर्मा यांचे निधन झाले. त्यांचे वय अवघे 24 वर्षे होते. ही बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री एंड्रिलाच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीच्या डोक्यात रक्त गोठले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री तिचे ऑपरेशन झाले आणि तेव्हापासून ती कोमात व्हेंटिलेटरवर होती.
 
एंड्रिला शर्मा यांना 1 नोव्हेंबरच्या रात्री ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 दिवस ती जीवन-मरणाची लढाई लढत होती. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री एंड्रिलाला शनिवारी संध्याकाळी  हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे तिची प्रकृती सतत खालावत गेली. रविवारी दुपारी एकच्या सुमारास या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.
 
एंड्रिला शर्माने इतक्या लहान वयात दोनदा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामना केला होता, पण तिनेन हारता  कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकली. जेव्हा अँड्रिया शर्माला दुसऱ्यांदा कर्करोग झाल्याचे निदान झाले तेव्हा तिच्यावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यादरम्यान त्याच्यावर केमोथेरपीचे सत्र झाले, त्यानंतरच डॉक्टरांनी ती पूर्णपणे बरी असल्याचे सांगितले.
 
एंड्रिला शर्माच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने टीव्ही ते ओटीटीपर्यंत काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ऐंद्रिला शर्माने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. ती पहिल्यांदा टीव्ही शो झूमरमध्ये दिसली आणि त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय शोमध्येही मुख्य भूमिका साकारल्या.

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments