Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिपाशा-करण पुन्हा रुपेरी पडावर एकत्र

Webdunia
शुक्रवार, 15 जून 2018 (10:50 IST)
बिपाशा बसू व तिचा पती करण सिंग ग्रोव्हर पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर काम करणार असल्याची चर्चा बर्‍याच काळापासून सुरू होती. खरे तर त्यानंतर याबाबत काहीच खबर नव्हती, परंतु त्या चित्रपटात नसले, तरी दुसर्‍या एका चित्रपटामध्ये मात्र हे दोघेही एकत्र दिसून येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गायक मिका सिंग एक फिल्म प्रोड्यूस करत आहेत, ज्यामध्ये लीड अ‍ॅक्ट्रेसच्या रूपात बिपाशा बसू आहे. बिप्स या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. तिने लग्नानंतर आजपावेतो कोणताही चित्रपट केला नव्हता. या चित्रपटासाठी करण सिंग ग्रोव्हरलाच मेल लीड म्हणून निवडण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे टायटल आदत असून, या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करून करणची भूमिका तयार करण्यात येणार आहे. या जोडीचे फॅन फॉलोइंग खूप मोठे असल्याने या चित्रपटामध्ये दोघांना एकत्र आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोघांचा विवाहानंतरचा हा पहिलाच एकत्र असलेला सिनेमा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र

कावेरी वडील शेखर कपूर यांच्या मासूम 2 चित्रपटात दिसणार

सीआयडी चाहत्यांना धक्का बसणार,एसीपी प्रद्युम्न शिवाजी साटम आता या शोला निरोप देणार

प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या पत्नीची पुन्हा कर्करोगाशी झुंज

सुपरस्टार जितेंद्रच्या एका कटू शब्दाने त्यांचे आणि रेखा यांच्यातील नाते आले होते संपुष्टात

सर्व पहा

नवीन

मजेदार विनोद: न्हावी एजंट तर नाही ना...

रेड २ चा ट्रेलर पाहिल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, वाह ! 'सूर्यवंशी'ने 'सिंघम'च्या चित्रपटाचे कौतुक केले

जैन धर्माचे मांगी तुंगी शिखरांचे धार्मिक महत्व

रेड 2'चा ट्रेलर रिलीज, अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यात जोरदार टक्कर, चित्रपट कधी प्रदर्शित होणार जाणून घ्या

कंगना राणौत यांना मोठा धक्का , रिकाम्या घराचे 1 लाख रुपयांचे बिल आले केला धक्कादायक खुलासा

पुढील लेख
Show comments