rashifal-2026

अर्जुन-मलायकाचे लवकरच शुभमंगल

Webdunia
बुधवार, 18 मे 2022 (18:43 IST)
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि अलीकडेच हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. असं असलं तरी चाहते या दोघांच्या लग्नाच्या घोषणेची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता लग्नाची बातमी समजल्यानंतर ते अधिकच उत्साहित झाले आहेत. असे म्हटले जात आहे की अर्जुन आणि मलायका या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लग्न करू शकतात. मात्र, याचदरम्यान अर्जुन कपूरनेही एक पोस्ट केली असून त्याने जे लिहिले आहे ते वाचून तो त्याच्या लग्नाच्या बातम्यांबाबत बोलतोय की काय, असाच अंदाज बांधला जात आहे. 
 
अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'माझ्यापेक्षा माझ्या आयुष्याबद्दल इतर सर्वांनाच जास्त माहिती आहे हे पाहून खूप छान वाटतं.' अर्जुनचे हे वक्तव्य ऐकून असे वाटते की, कदाचित त्याची प्रतिक्रिया ही केवळ लग्नाच्या बातम्यांबाबत आहे. असं असलं तरी, अर्जुनच्या आयुष्याबाबत जेव्हाही काही बातम्या येतात तेव्हा तो स्वत: त्याची प्रतिक्रिया देतो.  
 
अर्जुन आणि मलायका लग्नाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे . लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लग्नानंतर दोघेही लग्नाची पार्टी देणार असून त्यात त्यांचे इंडस्ट्रीतील मित्र उपस्थित राहणार आहेत. बरं, आता ही बातमी किती खरी आणि किती खोटं, जोपर्यंत अर्जुन स्वत: यावर स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत चाहत्यांना अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

फराह खानने दीपिका पदुकोण, मलाईका पासून गीता कपूर पर्यंत सर्वांना स्टार बनवले

सलमान खानच्या गाडीत गणेशमूर्ती दिसली, चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली

Pawna Lake लोणावळ्याजवळील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ

फातिमा सना शेखने बिकिनी घालून तलावात उडी मारली, चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर केला; व्हिडिओ व्हायरल

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

पुढील लेख
Show comments