Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

”ड्रीम गर्ल 2 चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय हे बघून आनंद वाटतो” आयुषमान खुराना याने दिली कबुली

Webdunia
गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (14:27 IST)
Dream Gilrl 2 Trailer आयुषमान खुराना पूजाच्या वेशात पुन्हा एकदा धमाल नाटकासह चाहत्यांची गर्दी खेचण्यासाठी तयार झाला आहे.
 
अलीकडे लॉन्च करण्यात आलेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभल्याने आयुषमानच्या अंगात उत्साह सळसळललेला दिसतो. त्याला त्याचे मित्र आणि कुटुंबियांकडून सतत कॉल आणि मेसेज येत असतात.
 
याविषयी बोलताना आयुषमान खुराना सांगतो, “ड्रीम गर्ल तर ब्लॉकबस्टर ठरला. पहिल्या भागामुळे आता सिक्वेलकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. 
 
ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय हे बघून आनंद वाटतो. माझे चाहते मोठ्या पडद्यावर फिल्म पाहतात, तेव्हा त्यांचं भरपूर मनोरंजन होईल हे बघून समाधान वाटतं.”
 
तो पुढे सांगतो, "ड्रीम गर्ल 2 हा सिनेमा प्रत्येकाला धमाल वाटतो, भरपूर हशा आणि पोटदुखेपर्यंत मनोरंजन करते. आम्ही वचन देतो की लोकांना एक अद्वितीय अनुभव मिळेल. मी सिनेमात साकारलेली पूजा लोकांच्या पसंतीस उतरली हे पाहून मला समाधान वाटत आहे! एखाद्या मुलीची वेषभूषा करून सगळा गोंधळ उडवणाऱ्या व्यक्तीची भूमिका करणं माझ्यासाठी मोठी जोखीम होती. माझा हा अवतार लोकांना आवडतो याचा मला खरोखर आनंद वाटतो. 
 
हे खूप फायद्याचे आहे. एखाद्याला हसवण्याची कामगिरी खूप मोठी असते. हा सिनेमा प्रेक्षकांना निराळा अनुभव देणारा आहे.”
 
दिनांक 25 ऑगस्ट रोजी ड्रीम गर्ल 2 चंदेरी पडद्यावर प्रदर्शित होईल आणि नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

आमेर किल्ला जयपूर

अनुपमाच्या सेटवर मोठा अपघात, विजेच्या धक्क्याने टीम सदस्याचा मृत्यू

महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान अभिनेता गोविंदाची तब्बेत बिघडली

मनोकामना पूर्ण करणारे भारतातील प्रसिद्ध 5 सूर्य मंदिरे

Netflix Down भारत आणि अमेरिकेत नेटफ्लिक्स डाऊन, हजारो यूजर्स नाराज

पुढील लेख
Show comments