Festival Posters

"जेव्हा काम करण्याची वेळ असते तेव्हा मला लॉकडाउन जाणवतच नाही”

Webdunia
गुरूवार, 11 जून 2020 (20:36 IST)
बॉलीवुडची सनशाइन गर्ल, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीज या लॉकडाउनचा उपयोग सकारात्मक गोष्टींसाठी करते आहे. वास्तविक पाहता, जॅकलीनचे व्यक्तिमत्वच अतिशय प्रेरक आहे आणि या कठीण काळातील आपल्या वेळेचा सदुपयोग करतानाच दुसऱ्यांना देखील प्रेरित करणे तिला छान जमते आहे.
 
जेव्हा जॅकलीनला लॉकडाउनमध्ये देखील तिच्या व्यस्त दिनाक्रमाविषयी विचारले असता ती सांगते की, "हो, माझ्या चित्रपटाचे प्रदर्शन, प्रमोशन, सलमानसोबतचे गाणे, बादशाहसोबतचे गाणे, मॅगझीन शूट आणि आता, शो- जेव्हा काम करण्याची गोष्ट असते तेव्हा मला लॉकडाऊनची जाणीवच होत नाही, आणि याबद्दल मी स्वत:ची आभारी आहे."
 
जॅकलीनने पुढे म्हटले की "व्यक्तिगतरीत्या, मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते आहे आणि माझ्या आवडत्या कामामध्ये स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी आवशक्य ते सर्व करते आहे आणि जितके होता येईल तितके निर्मितीक्षम बनते आहे. घरात राहणे आणि नित्यनेमाच्या कामासाठी देखील बाहेर पडता न येणे, ही खरंतर प्रत्येकासाठीच कठीण वेळ आहे परंतु, मी खूप भाग्यशाली आहे की मी स्वत:ला व्यस्त ठेवण्यात यशस्वी झाले आहे. या वेळेचा जितका होईल तितका निर्मितीक्षम उपयोग आपल्याला केला पाहिजे. सोबतच मला हा देखील विश्वास आहे की हा कठिण काळ संपल्यानंतर आपण सर्व पुन्हा एकदा आपले आयुष्य सामान्यपणे जगू शकू."
 
जॅकलीन गेले काही दिवस आपला नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'मिसेस सीरियल किलर'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती, ज्यात ती एका आधी कधीही न पाहिलेल्या रुपात आणि भूमिकेत दिसली आहे. जॅकलीनने या वर्षी अभिनेता सलमान खानसोबत 'तेरे बिना' 'मेरे आंगने मे' आणि 'गेंदा फूल' सारखे काही चार्टबस्टर हिट दिले आहेत. इतकेच नव्हे तर अभिनेत्रीने लॉकडाउनच्या काळात आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी घरातूनच शूट केलेला 'होम डांसर' नावाचा शोदेखील सादर केला ज्यात ती या शोची होस्ट होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

हेमा मालिनी यांनी दिल्लीत धर्मेंद्रसाठी प्रार्थना सभा आयोजित केली, दोन्ही मुली सोबत राहणार

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

गायक मोहित चौहान स्टेजवर गाताना अचानक खाली कोसळला, लोक मदतीला धावले

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात

पुढील लेख
Show comments