Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाहरूखच्या बंगल्याला 'आयकर'चे टाळे

Webdunia
बुधवार, 31 जानेवारी 2018 (12:54 IST)
अभिनेता शाहरुख खान याच्या बंगल्याला आयकर विभागाने टाळे ठोकले आहे. मात्र हा बंगला मुंबईतला मन्नत नाही तर अलिबाग येथील आहे. शेतीसाठी विकत घेतलेल्या जमिनिवर शाहरुखने त्याचा आलिशान बंगला उभारला आहे. 19 हजार 960 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हा बंगला बांधण्यात आला आहे. यासंदर्भात शाहरुखला आयकर विभागाने नोटीस पाठवली होती. 90 दिवसांच्या आत उत्तर न दिल्यास मालत्ता जप्त होते. हाच नियम पुढे करत अलिबाग येथील बंगल्याला टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
 
'बिझनेस स्टँडर्ड'ने दिलेल्या बातीनुसार शाहरुखचा हा बंगला म्हणजे 146.7 कोटींची ही मालमत्ता असून त्याचे बाजारमूल्य पाच पटीने वाढण्याची शक्यता आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. पाच बंगल्यांना जेवढी जागा लागते तेवढ्या जागेत शाहरुखचा हा एक बंगला उभा राहिला आहे. या बंगल्यात त्याचे हेलिपॅड आणि स्वीमिंग पुलही आहे.
 
शाहरुखने मोठा बंगला बांधण्यासाठी तो शेतकरी असल्याचे दाखवून जमीन विकत घेतल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, शाहरुखने 2005-06 देजा वू कंपनीला 8.4 कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज दिले होते. या संपूर्ण प्रकरणावर शाहरुखने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पूनम पांडे जाणार महाकुंभाला, नेटकऱ्यांनी ट्रोल केले

देवा' मध्ये शाहिद कपूरची दुहेरी भूमिका आहे का?

ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर का बनली? हॉट अभिनेत्रीच्या या निर्णयामागील कारण जाणून घ्या

पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलीने व्यक्त केली कृतज्ञता, सरकारचे आभार मानले

जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार

सर्व पहा

नवीन

अभिनेता सलमान खानची बहीण श्वेता रोहिराचा झाला भीषण अपघात

रोमँटिक हनिमूनसाठी भारतातील या 5 ठिकाणी भेट द्या

अर्चना पूरन सिंगचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आरोग्य अपडेट शेअर केले

विक्रांत मॅसीची डॉन 3 मध्ये एन्ट्री, खलनायक म्हणून रणवीर सिंगशी स्पर्धा करणार

शनिवार वाडा पुणे

पुढील लेख
Show comments