Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

''आपला समाज मुलींवर संस्‍कार घडवतो, पण चांगले पती घडवण्‍यामध्‍ये असमर्थ ठरतो'': जया प्रदा

Webdunia
जया प्रदाची टेलिव्हिजनवरील पदार्पणीय मालिका &TV वरील 'परफेक्‍ट पति'ने सुरूवातीला प्रेक्षकांसमोर काही खडतर प्रश्‍न समोर मांडले. एक आदर्श मुलगा आदर्श पती असू शकतो का? नवविवाहित वधूला तिच्‍या अपेक्षेप्रमाणे तिचा नवरा नसल्‍याचे समजल्‍यानंतर काय होईल? ही मालिका अनेक महिन्‍यांपासून अगदी रोचक पद्धतीने व प्रबळपणे या प्रश्‍नांची उत्‍तरे देत आहे. या मालिकेने सासू-सूनांच्‍या नात्‍याला एक नवे पैलू देण्‍यासोबतच एका महिलेने अयशस्‍वी विवाह व जोडीदाराचा कशाप्रकारे सामना करावा याबाबतचा समज देखील बदलला आहे.
  
अनेक नाट्यमय घटना असलेल्‍या या मालिकेमध्‍ये जया प्रदा राज्‍यश्री राठोडची भूमिका साकारताना दिसणार आहे. ती योग्‍य गोष्‍ट करण्‍यासाठी आणि तिची सून विधिताला (साना अमिन शेख) न्‍याय देण्‍यासाठी तिचा स्‍वत:चा मुलगा पुष्‍करला (आयुष आनंद) ठार करणार आहे. राज्‍यश्रीला माहित होते की,  तिचा मुलगा व सूनेच्‍या वैवाहिक जीवनामध्‍ये अनेक समस्‍या होत्‍या. पण आता सत्‍य उघडकीस आले आहे की, तिच्‍या मुलाचे वर्तन एका मनोरूग्‍णाप्रमाणे आहे आणि त्‍याने जीवापाड प्रेम करत असलेल्‍या पत्‍नीला, म्‍हणजेच विधिताला मारण्‍याचा प्रयत्‍न केला होता. धक्‍कादायक क्‍लायमॅक्‍समध्‍ये राज्‍यश्री बंदूकीने तिच्‍या स्‍वत:च्‍या मुलाला गोळी मारते, जे पाहणे प्रेक्षकांसाठी अत्‍यंत रोमांचक असणार आहे. तिच्‍या या कृत्‍यामधून समाजाला एक महत्‍त्‍वपूर्ण संदेश दिला जाणार आहे, तो म्‍हणजे खासकरून मातांनी त्‍यांच्‍या मुलांचे संगोपन चांगल्‍याप्रकारे करणे गरजेचे आहे. 
 
या अपारंपारिक संकल्‍पना आणि कथेमध्‍ये लेखकांनी घेतलेल्‍या धाडसी पावलाबाबत बोलताना जया प्रदा म्‍हणाली, ''मला 'परफेक्‍ट पति'सह टेलिव्हिजनवर पदार्पण केल्‍याचा आनंद होत आहे. ही मालिका एक आई आणि सासू म्‍हणून तिच्‍या प्रबळ भूमिकेवर प्रकाश टाकते. मातांनी त्‍यांच्‍या मुलांचे वर्तन समजून घेणे आणि त्‍यांच्‍या मुलांच्‍या कोणत्‍याही वाईट कृत्‍याकडे किंवा दोषाकडे दुर्लक्ष करू नये, जे आजच्‍या काळात अनिवार्य आहे. भारतीय समाज अनेक दशकांपासून मुलींना भावी चांगली पत्‍नी (संस्‍कारी सून) बनवण्‍याच्‍या हेतूने त्‍यांच्‍यावर संस्‍कार करत आला आहे. पण आपला समाज त्‍यांच्‍यासाठी पात्र असलेले चांगले पती घडवण्‍यामध्‍ये असमर्थ ठरला आहे. मुली मोठ्या होत असताना त्‍यांना समजावले जाते की, त्‍यांनी कोणत्‍याही स्थितीमध्‍ये पतीचा स्‍वीकार केला पाहिजे. वैवाहिक जीवनामध्‍ये कितीही भांडणे, समस्‍या असोत सतत पतीसोबतच राहिले पाहिजे. मातांनी त्‍यांच्‍या मुलांमध्‍ये बालपणापासून चांगली मूल्‍ये रूजवणे, त्‍यांच्‍यावर चांगले संस्‍कार घडवणे अत्‍यंत अनिवार्य आहे. ज्‍यामुळे ते महिलांचा आदर करतील. मला आनंद होण्‍यासोबतच अभिमानही वाटत आहे की, &TVने प्रबळ पुढाकार घेत माझ्या मालिकेच्‍या माध्‍यमातून हा महत्‍त्‍वपूर्ण संदेश देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.''  
 
या महत्‍त्‍वपूर्ण विषयाबाबत अधिक बोलताना ती पुढे म्‍हणाली, ''राज्‍यश्रीचे तिच्‍या मुलावर खूप प्रेम आहे. पण ती मुलाच्‍या गैरवर्तणूकीला आणि विधिताविरुद्धच्‍या अन्‍यायाला पाठिंबा देण्‍याला नकार देते. हा एक मोठा बदल आहे. ती अन्‍यायापेक्षा न्‍यायाची निवड करते आणि एक धक्‍कादायक पाऊल उचलते. प्रेक्षकांना हा बदल लवकरच पाहायला मिळणार आहे.'' 
तुम्‍हाला क्‍लायमॅक्‍स निश्चितच पाहायला आवडेल!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment 2024: गुगलवर जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली हिना खान

सलमान खान साऊथमध्ये खळबळ उडवणार,या सुपरस्टारच्या चित्रपटात दिसणार

हैदराबाद येथील घरातून अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक

रणबीर कपूरने 'ब्रह्मास्त्र' आणि 'ॲनिमल'च्या सिक्वेलचे अपडेट दिले

लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर...; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला

सर्व पहा

नवीन

गुम है किसी के प्यार में' शोमध्ये शीझान खानची धमाकेदार एन्ट्री, महत्त्वाची भूमिका साकारणार

सोनम कपूरने मुलगा वायुचे सुंदर फोटो शेअर केले

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबई

तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनचे पहिले वक्तव्य, कुटुंबीयांना भेटले

आवारा'पासून 'बॉबी'पर्यंत या चित्रपटांनी राज कपूरला बनवले 'द ग्रेटेस्ट शोमन

पुढील लेख
Show comments