Dharma Sangrah

जॉनी लीवर यांच्यावर तिरंगाचा अपमान केल्याचा आरोप लागला होता, मिळाली होती एवढी शिक्षा

Webdunia
बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (12:43 IST)
Johnny Lever Birthday : चित्रपटांमध्ये आपल्या कॉमेडीने विशेष ओळख बनवणारे अभिनेते जॉनी लीवर 14 ऑगस्टला आपला वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. जॉनी लीवर यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला असे आहे. त्यांनी आपल्या करियर मध्ये 350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेले जॉनी लीवर यांची परिस्थिती लहानपणी अतिशय बेताची होती. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. कुटुंबाला पैशांची मदत करण्यासाठी जॉनी लीवर आपले शिक्षण अर्धवट सोडून पेन विकू लागले. 
 
ताईच एकदा त्यांनी सांगितले की, माझ्या घरची परिस्थिती एवढी नाजूक होती की मी यामुळे दुखी होऊन रेल्वे ट्रॅकवर झोपवून घेतेले आणि डोळे बंद केले. कारण मला मृत्यूला समोर पाहायचे न्हवते. मी डोळे बंद केले तेव्हा माझ्यासमोर घरच्यांचा चेहरा आला. यामुळे मी माझा निर्णय बदलला आणि घरी परत गेलो. 
 
जॉनी लीवर एका कंपनीमध्ये काम करू लागले. ते कंपनीमध्ये कॉमेडी करून सर्वांना हसवायचे. ज्यामुळे त्यांना जॉनी लीवर असे नाव मिळाले. जॉनी लीवर कॉमेडी सोबत मिमिक्री देखील करायचे त्यांनी आपल्या करियरची सुरवात स्टॅंडअप कॉमेडियन केली होती. तसेच ते स्टेज शो देखील करायचे. यादरम्यान त्यांच्यावर सुनील दत्त यांची नजर पडली. त्यांनी जॉनी लीवर यांना चित्रपट 'दर्द का रिश्ता' मध्ये पहिला ब्रेक दिला. त्यानंतर जॉनी लीवर यांनी यशाच्या पायऱ्या चढण्यास सुरवात केली ते थेट यशाच्या शिखरावर जाऊन पोहचले. त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 
 
तसेच एकदा जॉनी लीवर यांच्यावर तिरंगाचा अपमान करण्याचा आरोप लागला होता. 1999 मध्ये ते एका शो मध्ये गेले होते. त्यांनी तिरंगा बद्दल काहीतरी बोलले. ज्यामुळे लोकांनी नाराज होऊन त्यांच्यावर तिरंगाचा अपमान करण्याचा आरोप लावला होता. ज्यामुळे त्यांना सात दिवसांची जेल झाली होती. तसेच जॉनी लीवर यांनी माफी मागितल्यामुळे ही शिक्षा एक दिवसाची करण्यात आली. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

सर्व पहा

नवीन

मृणाल ठाकूर आणि धनुषच्या लग्नाच्या अफवा खोट्या निघाल्या

गायक बी प्राकला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी, 10 कोटींच्या खंडणीची मागणी

दक्षिण भारतीय चित्रपटात अनिल कपूर यांची एंट्री, या सुपरस्टार सोबत दिसणार

Vasant Panchami Tourist Places वसंत पंचमीला भेट देण्यासाठी 5 सर्वोत्तम ठिकाणे

फरहान अख्तरचा '१२० बहादूर' हा चित्रपट ओटीटीवर पदार्पण करत आहे; तो कुठे पाहू शकतात जाणून घ्या

पुढील लेख
Show comments