rashifal-2026

काजोल साकारणार सावित्रीबाई मालुसरे!

Webdunia
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (16:23 IST)
'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटातील काजोलचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काजोल आणि अजय देवगणची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात काजोल तानाजी मालुसरेंची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका  साकारताना दिसणार आहे.

रोमँटिक भूमिका साकारणारी काजोल पहिल्यांदाच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. याआधी अजयने या चित्रपटातील इतर पात्रांचा लूक प्रेक्षकांसोबत शेअर केला होता. 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका स्वतः अजय देवगण साकारणार असून, अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान राजा उदयभान सिंग हे खलनायकी पात्रं साकारणार आहे.

'सेक्रेड गेम'ध्ये दिसलेला अभिनेता ल्युक केन्नी या चित्रपटात औरंगजेबाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे, तर अभिनेत्री पद्मावती राव वीरमाता जिजाऊ साकारणार आहेत. ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट येत्या वर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट थ्रीडीमध्ये असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

विनोदी कलाकाराच्या मुलाने जीवन संपवलं

पुढील लेख
Show comments