Marathi Biodata Maker

करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे....

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (21:12 IST)
प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. २८ जुलै रोजी रिलीज झालेला हा चित्रपट ‘गदर २’ आणि ‘ओएमजी 2’च्या शर्यतीत चित्रपटगृहांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
 
दरम्यान कोणताही चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा त्याचे यश हे त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जेवढी कमाई केली त्यावरुन मोजले जाते. करणच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीनं प्रचंड यश मिळवले आहे. बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीवर करणनं केलेलं वक्तव्य चर्चेत आलं त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी करण जोहर हा काय भलतचं बोलून गेला अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
करणला त्याचे चाहते प्रेमानं केजो असे म्हणतात. केजोनं केलेलं वक्तव्य खूप काही सांगून जाणारं आहे. करणनं यावेळी बॉलीवूडची क्वीन कंगनाविषयी केलेलं वक्तव्यही चर्चेत आलं आहे.
 
कंगनाच्या आगामी इर्मजन्सी चित्रपटाविषयी आपल्याला उत्सुकता असून प्रत्येकानं हा चित्रपट जरुर पाहावा अशा शब्दांत करणनं तिचं कौतुक केलं आहे. करणनं एक्सप्रेस अड्डावर त्याचं परखड मत मांडलं आहे. त्यात तो म्हणतो, बॉलीवूडमधील काही स्टार्स हे त्यांच्या चित्रपटाचा सोशल मीडियावर जो रिव्ह्यू येतो त्यावरुन नाराज असतात. हे चूकीचे आहे.
 
याशिवाय बॉलीवूडमधील काही अभिनेते त्यांच्या चित्रपटांच्या कमाईचे आकडे हे वाढवून सांगतात. रिव्ह्यू चांगले आले नाही की ही ट्रीक हमखास वापरली जाते. असे करणनं म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. यामुळे आता बॉक्स ऑफिसचे जे आकडे समोर येतात त्यावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न नेटकरी आणि चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

जावईबापूंचे प्रकार

आकाश ठोसरसोबतच्या नात्यावर आणि 'सैराट'च्या मानधनावर रिंकू राजगुरूने दिलं उत्तर

दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी गोव्यातील या ५ ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद!

पुढील लेख
Show comments