Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला छत्तीसगडमधून अटक

Webdunia
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (12:16 IST)
Shah Rukh Khan News : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी छत्तीसगडमधील रायपूर येथील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. फैजल खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने शाहरुख खानकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.   
 
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना आढळले की शाहरुख खानला धमकी देणारा फोन कॉल फैजल खानच्या मालकीच्या नंबरवरून आला होता. यानंतर पोलिसांनी फैजलचे लोकेशन शोधून त्याला त्याच्या रायपूर येथील घरातून अटक केली. तपासादरम्यान पोलिसांना समजले की शाहरुख खानला धमकी देणारा फोन फैजल खानच्या फोनवरून आला होता. पण, फैजलने पोलिसांना सांगितले की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपला फोन हरवला होता आणि त्याबाबत तक्रारही दाखल केली होती. सध्या मुंबई पोलिसांनी फैजल खानला रायपूर येथून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सर्व बाजूंचा तपास सुरू असून जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

तुळशी मानस मंदिर वाराणसी येथे तुळशी विवाहाच्या दिवशी दर्शन घेतल्यास भाग्य लाभते

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

जेव्हा श्रीदेवी बोनी कपूरवर चिडल्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

पुढील लेख
Show comments