Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mangal Dhillon passed away : अभिनेता मंगल ढिल्लन यांचे निधन

Webdunia
रविवार, 11 जून 2023 (10:43 IST)
चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते मंगल ढिल्लन यांचे निधन झाले आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी ते दीर्घकाळ झुंज देत होते. त्यांच्यावर लुधियाना येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारादरम्यान त्यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला. अभिनेता यशपाल शर्माने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
मंगल हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. याशिवाय त्याने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. 1988 मध्ये आलेल्या 'खून भरी मांग' या चित्रपटात ते छोट्या भूमिकेत दिसले होते. यानंतर ते  मनोरंजनाच्या दुनियेत सक्रिय राहिले.
 
अभिनयासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले. या अभिनेत्याचा जन्म फरीदकोटमधील पंजाबी कुटुंबात झाला. येथून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.या नंतर ते कुटुंबासह उत्तर प्रदेश गेले.ते नंतर पंजाबला परतले आणि पुढील शिक्षण घेतले. नंतर थिएटरमध्ये रुजू झाले. 1986 मध्ये त्यांना कथासागर ही पहिली टीव्ही मालिका मिळाली. बुनियाद या प्रसिद्ध टीव्ही मलिकने ते प्रेक्षकांच्या घरा घरात पोहोचले. 
 
आपल्या करिअरमध्ये त्यांनी किस्मत, द ग्रेट मराठा, मुजरिम हाजीर, रिश्ता मौलाना आझाद, नूर जहाँ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. पुढे त्यांना चित्रपटांसाठीही भूमिका मिळू लागल्या. खून भरी मांग नंतर, ते घायल महिला, दयावान, आझाद देश के गुलाम, प्यार का देवता, अकेला, दिल तेरा आशिक, दलाल, विश्वात्मा, निशाना यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले. त्यांच्या चित्रपट प्रवासात त्यांनी बहुतांश नकारात्मक भूमिका केल्या. तुफान सिंग या चित्रपटात ते अखेरचे मोठ्या पडद्यावर दिसले होते. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments