Festival Posters

मिताली म्हणते, प्रियांकानेच माझी भूमिका साकारावी

Webdunia
मंगळवार, 10 जुलै 2018 (12:33 IST)
सध्याचा बॉलिवूडमधला बायोपिकचा ट्रेंड पाहता आता भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित ही बायोपिक लवकरच येणार आहे. मितलीनं स्वतः यासाठी हिरवा कंदील दाखवला असून या चित्रपटात देसी गर्ल प्रियांकानं आपली भूमिका साकारावी अशी इच्छाही तिनं बोलून दाखवली आहे. मिताली राजचं आत्मचरित्रही या वर्षात प्रकाशित होणार आहे. तर दुसरीकडे मिताली राजच्या बायोपिकचंही काम सुरू आहे. मिताली स्वतः चित्रपटाच्या कथानकाकडेजातीनं लक्ष घालत आहे. 'प्रियांका चोप्रानं माझी भूमिका साकारावी असं मला वाटतं. तिच्यात आणि माझ्यात खूपच साम्य आहे त्यामुळे तिनं माझी भूमिका साकारली तर मला आवडेल. मात्र ही माझी इच्छा असून त्याबद्दल अंतिम  निर्णय चित्रपट निर्माते घेतील' असं मितालीनं स्पष्ट केलं आहे. भारतीय क्रिकेटर्सवर आधारित 'सचिनः अ बिलिअन ड्रीम', 'अजहर', 'एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी' असे चित्रपट आले आहेत. प्रेक्षकांचाही या चित्रपटांना तुफान प्रतिसाद लाभला आहे. पण महिला क्रिकेटपटूवर आधारित हा पहिलाच चित्रपट असणार आहे. प्रियांकानं या आधी बॉक्सर मेरी कोम हिची भूमिका देखील साकारली आहे. त्यामुळे मितालीच्या इच्छेचा मान राखत प्रियांका चित्रपटात काम करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा: कट कुठे रचला गेला होता? पोलिसांनी तपशील शेअर केला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आईचे नाव का जोडले?

सुबेदार'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अॅक्शन करताना दिसले

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

सर्व पहा

नवीन

बाफ्टा पुरस्कार जिंकल्यानंतर 'बूंग' पुन्हा प्रदर्शित होणार, या तारखेला थिएटरमध्ये दाखल होणार

सुपरस्टार विजय थलापतीचा घटस्फोट होणार

गायक शानच्या अनोख्या शैलीने, सुफी गायकांसह, 'दमादम मस्त कलंदर'ला एक नवीन वळण दिले

तुम्हालाही होळीचे वेगवेगळे रंग अनुभवायचे असतील तर देशातील या ठिकाणी नक्कीच भेट द्या

२७ वर्षांनंतर थलापती विजय यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येणार, पत्नी संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला

पुढील लेख
Show comments