Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nagabhushana: कन्नड अभिनेते नागभूषण यांच्या कारने जोडप्याला धडक दिली, महिलेचा मृत्यू

Webdunia
रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (16:44 IST)
Nagabhushana: कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नागभूषण यांच्याबाबत एक बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी बेंगळुरूमध्ये एका जोडप्याला अभिनेत्याच्या कारने धडक दिली. हे जोडपे रस्त्याच्या कडेला पायी जात असताना हा अपघात झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेचा मृत्यू झाला आहे, तर पुरुषावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
या प्रकरणातबेंगळुरूच्या कुमारस्वामी वाहतूक पोलीस ठाण्यात  एफआयआर नोंदवण्यात आला आहे. वृत्तानुसार, पोलिस तक्रारीत अपघाताचे कारण अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे असल्याचे म्हटले आहे. ही घटना शनिवारी रात्री 9:45 च्या सुमारास घडली. बेंगळुरूच्या वसंत पुरा मेन रोडवर फूटपाथवरून चालत असलेल्या जोडप्याला नागभूसमने धडक दिल्याचे बोलले जात आहे. ते उत्तरहल्लीहून कोननकुंटेकडे जात होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने कार दाम्पत्यावर चढवली नंतर त्यानंतर त्यांची कार विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात 48 वर्षीय प्रेमा या महिलेचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. त्याचवेळी प्रेमाचा पती कृष्णा (58 वर्षे) याच्या दोन्ही पायांना, डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली.
 
अपघातानंतर नागभूषण स्वत: जखमी दाम्पत्याला रुग्णालयात घेऊन गेले. नागभूषण नुकतेच 'तगारू पल्या' चित्रपटात दिसले होते. नागभूषण यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'संकष्ट करा गणपती' या चित्रपटातून केली होती. चित्रपटांव्यतिरिक्त नागभूषण हे नाट्यविश्वातही सक्रिय आहेत.







Edited by - Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

Pushpa 2 OTT Release: पुष्पा 2'चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार नाही

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स

सर्व पहा

नवीन

अभिनेता अल्लू अर्जुन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार

New Year 2025 : नवीन वर्ष साजरे करा महाराष्ट्रातील या अद्भुत ठिकाणी

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Christmas 2024: सांताक्लॉजचे गाव लॅपलँड

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

पुढील लेख
Show comments