suvichar

सलमानसोबत स्क्रीन शेअर करणार प्रभास

Webdunia
बॉक्स ऑफिसवर एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली 2 या चित्रपटाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. दक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या नावाभोवती असलेल्या चाहत्यांची गर्दी बाहुबली 2 च्या घवघवीत यशानंतर कमालीची वाढली आहे.
 
आता बॉलीवूडमध्ये प्रभास पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. चित्रपट निर्माता करण जोहर प्रभासला बॉलीवूडमध्ये लाँच करणार होता, अशीही चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी होती. प्रभास हा सध्या त्याच्या साहो चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पण तो लवकरच हिंदी चित्रपटातही दिसणार असल्याची चर्चा आहे.
 
सलमान खान आणि प्रभास हे दोन आघाडीचे अभिनेते रोहित शेट्टीच्या अॅक्शन चित्रपटांतून एकत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सलमान आणि प्रभास हे दोन्ही अभिनेते एकाच चित्रपटात स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

अल्लू अर्जुनपासून ते हृतिक रोशनपर्यंत, भारतातील टॉप ट्रेंडसेटिंग डान्सिंग सुपरस्टार्स

Shri Laxmi Narsimha Nira Narsingpur श्री क्षेत्र नीरा नृसिंहपुर पुणे

भारतीय मनोरंजन उद्योगातील एक प्रभावी शक्ती संजय लीला भन्साळी यांची ७ अविस्मरणीय नृत्य दृश्ये जी मनाला भिडतात

पती पत्नी और वो दो' गोंधळ आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल, आयुष्मान खुरानाने केला खुलासा

संजय दत्तच्या 'आखरी सवाल'चा ट्रेलर एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित होणार; निर्मात्यांची घोषणा

पुढील लेख
Show comments