Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रिया बापटचे हिंदी वेबसिरीजमध्ये पदार्पण

Webdunia
शनिवार, 6 एप्रिल 2019 (13:06 IST)
प्रिया बापट लवकरच नागेश कुकुनूर दिग्दर्शित 'सिटी ऑफ ड्रीम्स' या हिंदी वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.
 
राजकारणावर भाष्य करणाऱ्या आणि प्रियाच्या अवतीभवती फिरणाऱ्या या वेबसिरीज मध्ये तिच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू उलगडणार आहेत. प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने 'चारचाँद' लावले. 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनयकौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.
हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा गाजवणार यात शंका नाही. ॲप्लॉज एंटरटेनमेंटची निर्मिती आणि नागेश कुकुनूर यांचे दिग्दर्शन असणाऱ्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीजमध्ये प्रिया दिसणार आहे. नागेश यांनी यापूर्वी बॉलिवूडला 'डोर', 'इक्बाल', 'धनक' यांसारख्या उत्तम कलाकृती दिल्या आहेत. लवकरच हॉटस्टारवर ही वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

पुढील लेख
Show comments