Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राधिका आपटे वाढदिवस विशेष :शाहिद कपूरच्या चित्रपटाने करिअरला सुरुवात केली

Webdunia
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (11:05 IST)
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे प्रतिभावंत अभिनेत्रीं पैकी एक आहे. हिंदी व्यतिरिक्त राधिकाने तमिळ, मराठी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
राधिका आपटेने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात थिएटर्समधून केली.त्यांचा पहिला नाट्य अभिनय 'नको रे बाबा' होता.राधिकाने हिंदी,मराठी,तमिळ,बंगाली आणि इंग्रजीसह अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केले आहे.
 
राधिकाने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'वाह लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटाने केली. शाहिद कपूर, अमृता राव आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात राधिकाने अंजलीची भूमिका साकारली होती. यानंतर राधिकाने मुख्य अभिनेत्री म्हणून  बंगाली चित्रपट अंतहीन ने काम करायला सुरुवात केली. 
 
त्यानंतर 2009 मध्ये राधिकाने एका मराठी चित्रपटात काम केले आणि त्यानंतर तिने द वेटिंग रूममधून हिंदी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले.रक्त चरित्र चित्रपटातून राधिकाच्या कामाचे कौतुक झाले आणि त्यानंतर तिने एकापाठोपाठ एक चित्रपटांमध्ये आपला सर्वोत्तम अभिनय दाखवला.
 
राधिकाने शोर इन द सिटी, बदलापूर आणि हंटर या चित्रपटांमध्ये काम केले.या चित्रपटात  राधिका साईड रोलमध्ये होती, पण अभिनेत्रीने तिच्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकली. राधिकाची विशेष गोष्ट म्हणजे ती वेगळ्या पात्राची भूमिका साकारते.
 
चित्रपटांव्यतिरिक्त, राधिका प्रायोजक आणि शोद्वारे कमावते. राधिका शेवटची नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या रात अकेली है या चित्रपटात दिसली होती. चित्रपटात राधिकासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. आता ती मोनिका ओह माय डार्लिंगमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित होईल.
 
राधिकाचे वैयक्तिकआयुष्य
राधिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करायला आवडत नाही. तिच्या नात्याबद्दल कधीही अफवा पसरल्या नाहीत. राधिका लंडनमध्ये बेनेडिक्ट टेलरला भेटली आणि तिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. राधिकाने तिचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले. एवढेच नाही तर, अभिनेत्रीने त्याच्याशी लग्न केल्यानंतरही कोणालाही याबद्दल काहीच माहिती दिली नव्हती.

राधिकाला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.वाढदिवसाच्या शुभेच्छा राधिका आपटे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्नड अभिनेत्री रान्या रावच्या जामिनावर आज सुनावणी

IIFA Awards 2025: आयफा अवॉर्ड्स मध्ये लापता लेडीज चित्रपटाने धुमाकूळ घातला, या स्टार्सना मिळाले पुरस्कार

बिग बी, शत्रुघ्न यांसारख्या कलाकारांसोबत ‘नसीब’ चित्रपट स्वीकारताना घाबरले होते-हेमा मालिनी

मे महिन्यात तापमान वाढणार - 'पी.एस.आय.अर्जुन’ ९ मे रोजी येणार..

आमिर खान आणि जावेद अख्तर यांनी केली 'आमिर खान: सिनेमा का जादुगर'ची घोषणा! ट्रेलर प्रदर्शित!

सर्व पहा

नवीन

दुखापतीनंतरही अभिनेता सलमान खानने केले सिकंदरचे गाणे बम बम बोले शूट

कन्नड अभिनेत्री रान्या राव सोने तस्करी प्रकरणात मोठा खुलासा, हॉटेल मालकाला अटक

Holi 2025 विशेष मार्चमध्ये भेट देण्यासाठी तीन सर्वोत्तम ठिकाणे

अभिनेत्री काजोलने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती सोडणार का? नवीन होस्टच्या नावावर सोशल मीडियामध्ये चर्चा

पुढील लेख
Show comments