Dharma Sangrah

थोर समाज सुधारकला म्हटले चमचा, त्यावर नेटकरी म्हणाले अभिनेत्रीला तुला मानसोपचाराची गरज

Webdunia
सोमवार, 27 मे 2019 (10:32 IST)
आपल्या वाचाळ वाणीने सध्या अनेक पडीक नट नट्या प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. बदनाम हुवे तो क्या नाम तो हुवा असे सध्या चालले आहे. अशीच एक पडीक अभिनेत्रीने थोर समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्यावर वाईट शब्दात अवहेलना केली आहे. 
 
भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाणारे आणि सतीची प्रथा कायदेशीर बंद करणारे थोर समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांच्याविषयी अभिनेत्री पायल रोहतगी हिने वादग्रस्त विधान केले आहे. रोहतगी हिने ट्विटरवरून हे वादग्रस्त विधान केले असून ट्विटमध्ये तिने राजा राममोहन रॉय यांना ब्रिटीशांचा ‘चमचा’ होते, असे म्हटले आहे. 
 
यानंतर संतापलेल्या नेटक-यांनी तिचा खरपूस समाचार घेतला आहे.  इंडियन हिस्टरी पिक्स नावाच्या एका अकाउंटवरून तिने हे ट्विट केले आहे. २२ मे रोजी राजा राममोहन रॉय यांचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. फोटो शेअर करताना त्यात सतिप्रथेचे कट्टर विरोधक आणि समजा सुधारक अशी फोटो ओळ देण्यात आली होती. हे ट्विट पायलने शेअर करताना हे संतापजनक आणि वादग्रस्त टिप्पणी केली आहे.
 
ट्विट शेअर करताना पायल म्हणाली, सती प्रथा ही हिंदू विधवांना वेश्यावृत्तीसून परावृत्त करण्यासाठी बनवली होती आणि ती अजिबात प्रतिगामी नव्हती. उलट या प्रथेला विरोध करणारे राजा राममोहन रॉय हे ब्रिटीशांचा चमचा होते. ब्रिटीशांनी सती प्रथेचा अवमान करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांचा वापर केल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.पायलच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकांचा भडीमार करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी तुला मानसोपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

नीट वादावर बोलल्यामुळे विशाल दादलानीला 'इंडियन आयडॉल १६' मधून काढून टाकण्यात आले का? सत्य समोर आले

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments