Marathi Biodata Maker

प्रखर विरोध झाल्यामुळे रजनीकांतचा श्रीलंका दौरा रद्द

Webdunia
राजकीय पक्षांचा विरोध झाल्यामुळे तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला श्रीलंका दौरा रद्द केला आहे. श्रीलंकेतील तमिळ नागरिकांसाठी बांधलेले घरांचे हस्तांतरण करण्यासाठी रजनीकांत हे 9 व 10 एप्रिल रोजी श्रीलंकेला जाणार होते. विडुदलै चिरूतैगल काटिच या पक्षाचे नेते तोल तिरूमावळवन यांनी या भेटीला विरोध केला होता.
 
तसेच एमडीएमके पक्षाचे नेते वैको आणि टीव्हीके पक्षाचे नेते टी. वेलगुरुगन यांनीही या भेटीला विरोध केला होता. रजनीकांत यांनी श्रीलंकेचा दौरा रद्द करावा, असे आवाहन त्यांनी केले होते. आपण हा दौरा रद्द करत असून संबंधित कोणाही व्यक्तीने त्याला राजकीय स्वरूप देऊ नये, असे रजीनकांत यांनी प्रसिद्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या भेटीला विरोध करणार्‍यांचा युक्तिवाद मला पूर्णपणे पटलेला नाही, तरीही त्यांच्या विनंतीनुसार मी ही भेट पुढे ढकलत आहे. मी राजकरणी नाही, तर कलावंत आहे आणि लोकांचे मनोरंजन करणे हे माझे एकमेव कर्तव्य आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
 
लायका ग्रुप कंपनीच्या ज्ञानम फाउंडेशन या संस्थेने रजनीकांत यांचा दौरा आयोजित केला आहे. याच समूहाने 2.0 या चित्रपटशची निर्मिती केली आहे.
 
श्रीलंकेतील गृहयुद्धामुळे निर्वासित झालेल्या श्रीलंकन तमिळ लोकांसाठी संस्थेने घरे बांधली आहेत. या बांधलेल्या 150 घरांचे हस्तांतरण रजनीकांत यांच्या हस्ते होणार होते.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

आलिया भट्टने मुलगी राहाच्या भविष्याबद्दल एक मोठा खुलासा केला

Ramoji Film City Hyderabad जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ; जे एक अविस्मरणीय अनुभव देते

प्रियंका चोप्रा यांना Gold Gala 2026 मध्ये 'ग्लोबल व्हॅनगार्ड ऑनर' या प्रमुख सन्मानाने गौरविण्यात येणार

NESCO ड्रग्ज प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

प्रसिद्ध TV अभिनेता करण वाही ने सोडला अभिनय

पुढील लेख
Show comments