Marathi Biodata Maker

कपड्यांवरून रणवीर पुन्हा ट्रोल

Webdunia
मंगळवार, 28 जानेवारी 2020 (15:50 IST)
अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या  अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो जास्त चर्चेत असतो. रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र ढंगामध्ये हजर होतो. नुकताच रणवीरचा एक फोटो सोशल मीडिावर व्हारल झाला आहे. या फोटोमध्ये त्याने परिधान केलेल्या कपड्यांवरुन त्याला ट्रोल करण्यात आले.
 
नुकताच रणवीरने त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा ठिपक्यांचा शर्ट परिधान केला आहे. त्यावर रंगीबेरंगी पट्यांची पॅन्ट परिधान केली आहे. रणवीरचा हा लूक जुन्या काळातील एका अभिनेत्रीच्या कपड्यांप्रमाणे वाटत असल्याने नेटकरंनी त्याला ट्रोल केले आहे. एका नेटकरने तर पुन्हा दीपिकाचे कपडे परिधान केलेस का? असा प्रश्र्न दीपिकाला विचारला आहे. तर काही नेटकर्‍यांनी त्याच्या आत्मविश्वासाची प्रशंसा केली आहे. लवकरच रणवीरचा '83' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 25 जून 1983 रोजी लंडनमधील लॉर्डस्‌च्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित '83' हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सली, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

सर्व पहा

नवीन

आखाती देशांमध्ये 'बॉर्डर २' प्रदर्शित होण्यास नकार, धुरंधरनंतर सनी देओलच्या चित्रपटावर बंदी

Vasant Panchami Tourist Places वसंत पंचमीला भेट देण्यासाठी 5 सर्वोत्तम ठिकाणे

'The Lion King' फेम डायरेक्टरचे निधन

प्रसिद्ध खलनायकाचे दुर्दैवी निघन

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

पुढील लेख
Show comments