Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निर्माती प्रेरणा अरोराला सहा महिन्यांचा कारावास

Webdunia
मंगळवार, 3 मार्च 2020 (15:01 IST)
प्रसिद्ध चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हिला मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास ठोठावला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत प्रेरणाला गजाआड करण्यात येणार आहे. कारावासात पाठवण्यासाठी आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये  आत्मसमर्पण करण्याचे आदेश कोर्टाने दिले.  
 
प्रेरणा अरोराने ‘रुस्तम’, ‘पॅडमॅन, ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘गॉथिक एंटरटेनमेंट’ कंपनीने ‘क्रिअर्स एंटरटेनमेंट’च्या प्रमुख प्रेरणा अरोरा-प्रोतिमा अरोरा यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर कोर्टाने कारवाई सुरु केली होती. कोर्टासमोर झालेल्या तडजोडीनुसार ‘क्रिअर्स एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने ‘गॉथिक एंटरटेनमेंट’ला 25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं ठरलं होतं. मात्र ‘क्रिअर्स एंटरटेनमेंट’ अडीच कोटींचे दोन हप्ते भरण्यातही अपयशी ठरलं. चेक बाऊन्स झाल्यामुळे ‘गॉथिक’ने उच्च न्यायालयात धाव घेतली.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments