Marathi Biodata Maker

यापुढे कधीही अशी चूक करणार नाही असं म्हणत सैफने अमृता सिंगची कॅमे-यासमोर मागित होती माफी

Webdunia
रविवार, 16 ऑगस्ट 2020 (09:21 IST)
क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागौर यांचा मुलगा सैफ अली खान याचा आज वाढदिवस. 1992 साली ‘परंपरा’ या चित्रपटातून सैफने आपल्या अभिनय कारकिदीर्ची सुरूवात केली. नशीबानेही साथ दिली आणि ‘परंपरा’ सुपरहिट झाला. या चित्रपटामुळे सैफचा मार्ग सोपा झाला. यानंतर आशिक आवारा, पहचान, इम्तिहान, ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी असे अनेक चित्रपट त्याने केले. तुम्हाला कदाचित सैफबद्दलचा एक जुना किस्सा माहित नसावा तर आज तुम्हाला सांगणार आहोत.
तर हा किस्सा आहे सैफ व त्याची पत्नी अमृता सिंगबद्दलचा. सैफला कॅमे-यासमोर अमृताची माफी मागावी लागली, त्याचा हा किस्सा. अमृता व सैफ तेव्हा पती-पत्नी होते आणि सैफ ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या सिनेमात बिझी होता. या सिनेमाच्या प्रीमिअरला सैफ पोहोचला आणि पोहोचताक्षणी लेडी फॅन्सनी त्याच्याभोवती गर्दी केली. यादरम्यान एका चाहतीने सैफला डान्स करण्याची विनंती केली. सैफने तिचे मन राखण्यासाठी तिथेच डान्स करायला सुरुवात केली. पण त्या चाहतीच्या बॉयफ्रेन्डला ही गोष्ट रूचली नाही.
सैफ आपल्या गर्लफ्रेन्डसोबत डान्स करतोय हे पाहून तो भडकला. यावरून भांडण झाले आणि संतापलेल्या त्या बॉयफ्रेन्डने सैफला जोरदार बुक्का मारला. प्रीमिअरस्थळी धडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. अर्थात सैफने पोलिसांकडे न जाता हे प्रकरण तिथेच संपवले होते. पण आपले हे वागणे अमृताला अजिबात आवडलेले नाही, याची जाणीव सैफला झाली होती. यानंतर सैफने कॅमे-यासमोर अमृताची माफी मागितली होती.
यापुढे कधीही अशी चूक करणार नाही, असे वचन त्याने अमृताला दिले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली

Weekend Trip दोन दिवसात फिरता येतील असे महाराष्ट्रातील रमणीय ठिकाणे

सिस्टम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, सोनाक्षी सिन्हा एका शक्तिशाली वकिलाच्या भूमिकेत

मौनी रॉयने घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले, हात जोडून चाहत्यांना आवाहन केले

मूव्हर्स अँड शेकर्स' नंतर, शेखर सुमन 'शेखर टुनाईट' हा कार्यक्रम सादर करणार

पुढील लेख
Show comments