Marathi Biodata Maker

सलमान खान परतणार ‘चुलबुल’ पांडेच्या भूमिकेत

Webdunia
बुधवार, 20 मार्च 2024 (12:23 IST)
सलमानखानचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच नुकतीच अशी अफवा पसरली होती की, सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खान ‘दबंग ४’ वर चर्चा करण्यासाठी ‘जवान’ दिग्दर्शक अ‍ॅटलीची भेट घेतली होती. दबंग २ चे दिग्दर्शन करणा-या अरबाजने नुकतीच याबाबत माहिती दिली. अरबाज खानने सांगितले की, तो त्याच्या आयुष्यात कधीही दिग्दर्शक एटलीला भेटला नाही.
 
अरबाजने ‘दबंग ४’ ची पुष्टी करत सांगितले की सलमान खानला देखील दबंग ४ करण्यात रस आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर तो प्रोजेक्टवर काम करणार असून, मला ‘दबंग ४’ चे दिग्दर्शन करायला आवडेल असेही अरबाज म्हणाला. अरबाज आणि सलमान सध्या त्यांच्या वैयक्तिक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत.
 
सलमानचे आगामी चित्रपट
सलमानकडे ‘दबंग ४’ व्यतिरिक्त शाहरुख खानसोबत ‘टायगर व्हर्सेस पठाण’ हाही चित्रपट आहे. अलीकडेच, त्याने ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित साजिद नाडियादवालासोबत एका नवीन चित्रपटाची घोषणा केली असून, हा बिग बजेट चित्रपट २०२५ च्या ईद दरम्यान प्रदर्शित करण्यात येणार आहे. सलमान खान शेवटचा ‘टायगर ३’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण २८६ कोटींची कमाई केली होती .

Edited By- Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मरणार्थ आशियातील सर्वात मोठे रुग्णालय उभारले जाणार हृदयनाथ मंगेशकर यांनी केली घोषणा

प्रसाद ओकच्या घरात सनई-चौघडे: अभिनेत्याची होणारी सून मारवाडी; सोशल मीडियावर साखरपुड्याच्या फोटोंची चर्चा

एप्रिलमध्ये फिरायला जाण्यासाठी महाराष्ट्रातील 7 थंड हिल स्टेशन

धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर आपली चांगली कामगिरी सुरू ठेवत हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू Bhim Janm Bhoomi Mhow

पुढील लेख
Show comments